Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान, सस्पेन्स वाढला

रेजिनाल्ड, ढवळीकरांसह नीळकंठ हळर्णकर आणि उल्हास तुयेकर यांचं नावही चर्चेत

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सोमवारपर्यंत खातेवाटप जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्यामुळे वजनदार खात्यांसाठी चढाओढ सुरु झाली आहे. महत्त्याच्या खात्यांचा पदभार कुणाला मिळतो याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं आहे. यातच कॅबिनेटमधील उरलेल्या तीन मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याचीही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. यात भाजपच्या आमदारांनाच मंत्रिपदी संधी द्यायची, पाठिंबा दिलेल्या अपक्षांना मंत्रिपद द्यावं की नेत्यांसह कार्यकर्त्यांचा विरोध डावलून मगोपला मंत्रिमंडळात स्थान द्यावं हा पेच मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसमोर आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदा विराजमान होताना प्रमोद सावंतांनी आपल्यासोबत 8 सहकारी मंत्र्यांची निवड केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत या मंत्र्यांनाही राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. गोव्याच्या कॅबिनेटमध्ये 11 मंत्र्यांचा समावेश असू शकतो. 11 पैकी 8 मंत्र्यांचा शपथविधी यापूर्वीच झालेला आहे. आता उरलेल्या तीन कॅबिनेट मंत्रिपदांसाठी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या पदांसाठी अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मगोपचे (MGP) सुदिन ढवळीकर यांचं नाव जास्त चर्चेत आहे.

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये नावेलीतून उल्हास तुयेकर यांनी भाजपला इतिहास रचत विजय मिळवून दिला. सासष्टी तालुका हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला मानला जातो. मात्र असं असतानाही भाजपला सासष्टीमध्ये विजय मिळवून देणाऱ्या उल्हास तुयेकर यांचीही कॅबिनेटपदासाठी इच्छा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 3 जागांसाठी दावेदारांची संख्याही वाढताना दिसत आहे. यात आलेक्स यांना उपसभापतीपद देऊन त्यांचा पत्ता कट केला जाऊ शकत होता. मात्र ऐनवेळी आलेक्स यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत भाजपने सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांना उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवली.

काणकोणचे आमदार रमेश तवडकर आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांना विधानसभेचं सभापती आणि उपसभापतीपद दिल्यानंतर आता उरलेल्या तीन जागांसाठी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचं नावही चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांचा विचारही मुख्यमंत्री (CM) करत असल्याची चर्चा आहे. त्यातच रेजिनाल्ड आणि तुयेकर दोघेही सासष्टी तालुक्याचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळू शकतं असं अंदाज आहे. यातच मगोपच्या जीत आरोलकरांना भाजपकडून (BJP) ऑफर दिल्याचं बोललं जात आहे. मगोप सोडून भाजपमध्ये आल्यास मंत्रिपदाची संधी जीत आरोलकर यांना दिली जात असल्याची चर्चा आहे. जर यात तथ्य असेल तर जीत आरोलकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT