Suspected chikungunya patients in salcete area including Margao Dainik Gomantak
गोवा

मडगावसह सासष्टी परिसरात चिकनगुनियाचे संशयित रुग्ण

मडगावसह सासष्टीच्या इतर भागात चिकनगुनियाच्या संशयित रुग्णांचे प्रमाण डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : मडगावसह सासष्टीच्या इतर भागात चिकनगुनियाच्या संशयित रुग्णांचे प्रमाण डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. मडगावमध्ये आके, घोगळ, रावणफोंड, बोर्डा, मालभाट या भागांमध्ये संशयित रुग्ण सापडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय चिंचोणे, असोळणा, नावेली परिसरातही चिकनगुनियाचे संशयित रुग्ण आढळले असल्याचे डॉक्टर सांगतात.

(Suspected chikungunya patients in salcete area including Margao)

हा आजार पावसाळ्यात डांस चावल्याने होत असतो. हा आजार गंभीर नसून रुग्ण आपोआप बरा होतो. ताप येणे, हाडांचे सांधे दुखणे, अंगाला डाग पडणे व डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत.

जवळ जवळ चार ते पाच आठवडे पाय सुजलेले असतात. ताप सहा ते सात दिवस राहतो. ही सगळी लक्षणे असलेले रुग्ण आमच्याकडे तपासणीसाठी येत असतात, असे मडगावमधील एका डॉक्टरने सांगितले.

हा आजार हवामानात होत असलेल्या बदलामुळे उद्‍भवतो असे चिंचोणे येथील डॉ. सॅम्युअल अरवट्टीगी यांनी सांगितले. घराच्या परिसरात पाणी साठू देऊ नये व डासांची पैदास अडविणे हा त्यावर उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य खात्याकडून नियमित आढावा

मडगावमध्ये पावसाळी रोगांचे रुग्ण आढळतात याची चौकशी केली जात असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी दिली. मडगाव व परिसरातील स्थितीचा आम्ही नागरी आरोग्य केंद्रामार्फत नियमित आढावा घेत आहोत, असेही डॉ. काकोडकर म्हणाल्या. चिकनगुनिया किंवा डेंग्यूचे रुग्ण वाढत नाहीत व क्वचितच आढळतात, असेही त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT