Suspect runs for pre-arrest bail in national flag desecration case Dainik Goamntak
गोवा

Goa News: राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी; संशयिताची अटकपूर्व जामिनासाठी धाव

सांताक्रुझचे पंचसदस्य इनासिओ परेरा यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.

Shreya Dewalkar

फेसबुकवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी नाझारिओ डिसोझा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणी उद्या 21 ऑगस्टला पणजी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली आहे. सांताक्रुझचे पंचसदस्य इनासिओ परेरा यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.

नाझारिओ डिसोझा याने राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याबरोबरच त्याच्या कोडचे उल्लंघन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अवमान केला आहे. त्याने केलेल्या या कृत्याबद्दल तक्रार दाखल करत असल्याचे सांताक्रुझचे पंच सदस्य असलेले इनासिओ परेरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, संशयित नाझारिओ यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आजारी असल्याचे कारण सांगून उपस्थित राहिले नाही.

आक्षेपार्ह पोस्ट

स्वातंत्र्यदिनानिमित्त नाझारिओ डिसोझा याने फेसबूक प्रोफाईलवर एक आक्षेपार्ह व अवमानास्पद पोस्ट टाकली आहे. त्यात देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रध्वजावर गिरगिट म्हणून चित्रित केले आहे.

हा अनादर केवळ आपल्या राष्ट्रीय ध्वजाचाच नव्हे, तर पंतप्रधानांचाही अवमान आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह वर्तनाबाबत जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार परेरा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT