Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: बॉक्सर युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयिताला तीन दिवसांची कोठडी

काही दिवसांपूर्वीच संशयिताने या प्रशिक्षित बॉक्सर युवतीवर ओळखीचा फायदा घेत तिच्यावर कथित लैंगिक अत्याचार केले होते.

दैनिक गोमन्तक

Mapusa Crime News: एका वीस वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केलेल्या संशयित युसूफ शेख (४९, बार्देश) यास म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

काही दिवसांपूर्वीच संशयिताने या प्रशिक्षित बॉक्सर युवतीवर ओळखीचा फायदा घेत तिच्यावर कथित लैंगिक अत्याचार केले होते. संशयिताने अशाचप्रकारे शुक्रवारी (ता.२८) पीडित युवतीला तिच्या कॉलेजस्थळी गाठून तिच्याशी कथित जवळीक साधून तिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा पीडित युवतीने संशयिताकडे धाडसी प्रतिकार करीत कॉलेज रस्त्यावरच संशयिताला चोप दिला. याशिवाय त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढलेला. मात्र, सायंकाळी उशिरा पोलिसांनी संशयिताला म्हापशातून अटक केली. याप्रकरणी संशयिताने वापरलेली कारगाडी व त्याचा मोबाईल जप्त केलाय.

याप्रकरणी पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ५०९, ३७६, ५०६(२) व ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

संपूर्ण प्रकरण असे की....

म्हापसा येथील एका महाविद्यालयाच्या आवारात येऊन लैंगिक छळ व सतावणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युसूफ शेख यास एका 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीने आज चांगलाच धडा शिकवला.

बॉक्सर असलेल्या या युवतीने संशयितावर लाथाबुक्क्यांनी धाडसी प्रतिकार केला. यावेळी या युवतीचा रुद्रावतार पाहून संशयिताने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा त्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

ओळखीचा फायदा घेऊन छळवणूक केल्याच्या रागातून या युवतीने संशयित युसूफ शेख याला चोप देत त्याच्या डोळ्यांत मिरची स्प्रे मारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून रात्री उशिरा त्याला त्याच्या म्हापशातील घरातून अटक केली.

उपलब्ध माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडितेची दुचाकी नादुरुस्त झाल्याने ती दुचाकी घेऊन एका शोरूममध्ये गेली होती. यावेळी संशयिताने तिला मोबाईलवर फोन करून कुठे आहेस असे विचारले असता, तिने आपण शोरूममध्ये असल्याचे सांगितले.

त्यानंतर संशयित शोरूमकडे गेला व त्याने पीडितेला या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीसाठी जास्त पैसे घेतात असे सांगून तो तिला घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. तेथे मेकॅनिकने गाडीचे काही पार्टस् नवीन घालावे लागतील असे सांगितले.

त्यानंतर गाडीचे पार्टस् आणण्याचा बहाणा करून संशयिताने तिला आपल्या कारमधून एका निर्जनस्थळी नेले व गाडीतच त्याने तिचा लैंगिक छळ केला. या घटनेनंतर संशयिताने पीडितेला पुन्हा घरी आणून सोडले. या प्रकारामुळे पीडितेच्या मनात संशयिताविरुद्ध प्रचंड द्वेष निर्माण झाला होता.

या कथित लैंगिक अत्याचारानंतर पीडितेने संशयिताला आपल्या मोबाईलवरून ब्लॉक केले. मात्र, संशयिताने पीडितेला कॉलेजस्थळी गाठून तिला आपण शुक्रवारी (ता. २८) येऊन भेटणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, तो आज शुक्रवारी पीडितेचे कॉलेज सुटण्याच्यावेळी घटनास्थळी आला व तिला त्रास देऊ लागला. यावेळी पीडितेने आपल्या बॅगेतील मिरची स्प्रे त्याच्या डोळ्यांत मारला व बेदम चोपही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT