Goa crime news Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रागाच्या भरात पत्नीचा केला खून, 3 वर्षाच्या मुलाला घेऊन पळाला; झारखंडच्या व्यक्तीला न्यायालयाने ठरवले दोषी

Goa Murder Case: नोव्हेंबर २०२१ साली मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरीचो दांडो, वोएलेमोल सांज जुझे दी आरियल येथील एका दगडाच्या क्रशरवर खुनाची वरील घटना घडली होती.

Sameer Panditrao

मडगाव: आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेला गुलशन तिर्की याला न्यायालयाने दोषी ठरविले. दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरिन पॉल यांच्या न्यायालयाने बुधवारी (ता.१४) हा निवाडा दिला. गुरुवारी (ता.१५) न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे.

नोव्हेंबर २०२१ साली मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरीचो दांडो, वोएलेमोल सांज जुझे दी आरियल येथील एका दगडाच्या क्रशरवर खुनाची वरील घटना घडली होती. आरोपी गुलशन हा मूळ झारखंड राज्यातील असून त्याने आपली पत्नी बासंती (२०) हिच्या पोटात चाकू खुपसला होता.

चाकूच्या हल्ल्याने बासंती गंभीर जखमी होऊन नंतर तिला इस्पितळात मरण आले होते. गुलशन व बासंती दोघेही भाड्याच्या खोलीत राहायचे. खुनाच्या घटनेनंतर आरोपीने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन घटनास्थळाहून पळ काढला होता.

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावताना गुलशनला गुडी-चांदर येथे पकडले होते. खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला होता. न्यायालयात सरकार पक्षातार्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT