सुशेगाद पात्रांव
सुशेगाद पात्रांव दैनिक गोमन्तक
गोवा

सुशेगाद पात्रांव: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...!

गोमन्तक डिजिटल टीम

फसगत झाली, कुणाची जबाबदारी कुणावर आली, घोंघड्यापायी कीर्तन ऐकायची वेळी आली....

पात्रांव रागाने लालबुंद झाला.

'मी कुणाचीही (बेबद्यांची) ओझी वाहणार नाही', म्हणत तो नटसम्राटाच्या आवेशात उठला....... मद्यालयात प्रवेश करताना शुद्धीत आसलेला व्यक्ती शुद्ध हरपून बाहेर पडतो यात माझा काय दोष? अशी जिवंत मढी मी का ओढायची? असे म्हणत त्याने जाब विचारण्याचा चंग बांधला.

पात्रांव चिंतेत होता.

"त्या" मंत्र्यांच्या वक्तव्याला धाडसी म्हणावं? का आपल्या जबाबदारीला लाथ मारून दुसऱ्याच्या खांद्यावर कसं फेकायचं, याची शिकवण देणारे मुरब्बी राजकारणी म्हणावं हे त्याला कळेना. खरं तर राजकारणीच मंत्री-संत्री होत असतात पण, आपण त्यांना फक्त मंत्री म्हणतो अन् त्यांच्यातला राजकारणी विसरतो. इथंच पहिली फसगत झाली.

समस्येपेक्षा उपाय चढ झाल्याने पात्रांव भलताच संतापला असून त्यानं यल्गार पुकारलाय.

अपघात रोखायला शासनानं नियम अधिक कडक केले, जागोजागी सीसीटीव्ही बसवले, वेग टिपणारे कॅमेरे बसवले. यातून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून भरसाठ गोळा झालेला दंड सरकारी तिजोरीत गेला. तरीही अपघात थांबले नाहीत, रस्ते चांगले झाले नाहीत. अशात 'झुवारी' सारखं भीषण प्रकरण घडलं आणि इतिहास जमा देखील झालं. याचा जाब विचारायचा कुणाला आणि विचारलाच जर का तर, पहिले पाढे पंचावन्न ठरलेलेच..

बरं तुमचेच 'रवी'तेज असणारे मंत्री म्हणतात, 'गोव्याचे लोक दारू पितात पण ते थरथरत किंवा रस्त्याने डुलत नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लोकं 10, 20 रूपयांची दारू पितात आणि त्यांना सोडायला 1000 रूपयांची गाडी करून द्यायची अशानं बार मालकांचे दिवाळं निघेल.' दुसऱ्याकडे बोट दाखवत का होईना पण, बात तो सौ टके की कहीं है मंत्री महोदयने. पण, मंत्रिमंडळातील सहकारी असून दोघांच्या विचारात केवढी ती तफावत?

पात्रांव जबाबदारी घेण्यास तयार आहे, पण...

मद्यपीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे, मान्य! तुम्ही सोपवलेली जबाबदारी घेऊन आम्ही 'बार'रथ बांधणीला देखील लागू, पण फक्त 'बार'च जबाबदार आहेत का? गोव्यात उघड्यावर दारू पिण्यास मनाई आहे. पण, कुणालाही विचारलं तरी तो सांगेल की अनेक ठिकाणी राजरोसपणे उघड्यावर दारू पिण्याचे धंदे चालतात. कसिनोत देखील दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. समस्या मद्यपी आहे. त्यांना आवर घालणे ही सरकारची प्राथमिकता असायला हवी पण, सरकार सेफ गेम खेळतयं, अर्थचक्राला धक्का न लावता. देख रहा है बिनोद इसे कहते है पॉलिटिक्स! असा अलिकडचं फेमस झालेला सिनेमातला डायलॉगच्या त्याच्या मनात उमटला.

हताश अन् स्वत:वरच नाराज झालेला पात्रांव उठला. काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर मंत्री सुदिन ढवळीकर पुटपुटलेल्या 'सामना'मधील 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' या ओळी तो मनात घोळत निघून गेला.

ता.क: नुकतेच गोवा सरकाने बिअरच्या अबकारी करात वाढ केली आहे. यामुळे सरकारला 50 कोटींचा फायदा होणार आहे. तसेच, दुसऱ्याच्या परवान्यावर कोणीही मद्यालय चालवू शकते. हा बदल कोणत्या ईरा (णी) द्याने केलाय, हे ना जनतेला, ना बारचालकांना उमगतेय...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT