Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघातातून बचावला म्हणून निश्वास सोडला पण काळाने घात केला, ट्रक चालकाचा दुर्दैवी अंत

चढावावर गिअर बदलताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कलंडला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident गेले काही दिवस राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत.

असाच एक अपघात काणकोण येथे घडलाय. गोव्याहून कर्नाटककडे कोळसा वाहतूक करणारा ट्रक ( क्रमांक CG 15 DF 9816) काणकोण लोलये येथे एका तीव्र चढावावर कलंडला. ही घटना रविवारी रात्री 1 च्या सुमारास घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोळशाची वाहतूक करत होता, दरम्यान चढावावर गिअर बदलताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कलंडला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

घटना घडल्यावर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला मात्र दुर्दैवाने त्याचा जीव वाचवण्याचा हा प्रयत्न काही काळातच फोल ठरला.

या घटनेसंबंधीत काही फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत. घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर लिफ्ट मागून कर्नाटक येथे जात होता मात्र जाताना कारवार येथे त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर येतेय.

या घटनेचा तपास कर्नाटक पोलीस करत असून पोलिसांनी काणकोण येथेही भेट देऊन अपघाग्रस्त ट्रकची पाहणी केलीय. ट्रक ड्रायव्हरला कारवारमध्ये नेमका अपघात झाला याचाही शोध कर्नाटक पोलीस घेत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT