cm pramod sawant 
गोवा

Surla Mining Dump Issue: तोडगा निघाल्याशिवाय सुर्लमध्ये खाण सुरु होणारच नाही! ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर CM सावंतांचे यांचे मोठे वक्तव्य

CM Pramod Sawant mining statement: सुर्ल गावात साळगावकर खाण कंपनीच्या जुन्या खनिज डंपच्या हाताळणीसंदर्भात काही कागदपत्रे आणि परवानग्या मिळाल्या असल्या, तरी याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी: सुर्ल गावात साळगावकर खाण कंपनीच्या जुन्या खनिज डंपच्या हाताळणीसंदर्भात काही कागदपत्रे आणि परवानग्या मिळाल्या असल्या, तरी याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. गावातील धूळ प्रदूषण तसेच इतर समस्यांवर योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत खाण सुरू होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

सुर्ल गावात ३५ वर्षांपूर्वी साठविलेल्या खनिज डंप हाताळणीला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या डंप हाताळणीमुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर आज सुर्ल येथील साळगावकर गेस्ट हाऊसजवळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

डंप हाताळणीस ग्रामस्थांचा विरोध

एक स्थानिक खाण कंपनी खाणमातीचा मोठा ढिगारा ३५ वर्षांनंतर परत उचलून नेणार असल्याची चाहूल लागल्याने पर्यावरणावर होणारे परिणाम नजरेसमोर ठेवून सुर्ल येथे डंप हाताळणीला विरोध करत स्थानिकांनी निदर्शने केली. या गंभीर विषयावर आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. भायलीफाळ येथे झालेल्या बैठकीत या डंपिंगला ठाम विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाचे पर्यावरण, शेती, पाण्याचे स्रोत आणि भविष्यातील पिढ्यांचे हित जपण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे. डंपिंगचा प्रश्न हा केवळ मातीच्या ढिगाऱ्यापुरता मर्यादित नसून गावाच्या पर्यावरणीय सुरक्षिततेशी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाशी संबंधित असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत रणकंदन; आझाद मैदानावर आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री!

IIT Exam Cheating: ‘मुन्नाभाई’ स्टाईल जुगाड पडला महागात! फर्मागुढीच्या आयआयटी परीक्षेत ब्लूटूथचा वापर करुन कॉपी करणारे दोघे विमानतळावर जाळ्यात

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT