Goa Mining Auction Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Auction: सुर्ला लोह खनिज खाण ब्लॉक JSW कडे

इ-लिलावात या आधी सर्वाधिक बोली लावत जिंदाल कंपनीने कुडणे खनिज ब्लॉक्सचा लिलाव जिंकला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining Auction राज्य सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने सुरू असलेल्या इ-लिलावात या आधी सर्वाधिक बोली लावत जिंदाल कंपनीने कुडणे खनिज ब्लॉक्सचा लिलाव जिंकला आहे. खाण खात्याच्या पहिल्या यशस्वी इ-लिलावानंतर दुसऱ्या पाच खनिज ब्लॉक्सचा 21 एप्रिलपासून इ-लिलाव सुरू झालाय.

यासाठी 11 कंपन्यांनी आपल्या 24 निविदा सादर केल्या आहेत. यातील पहिल्या अडवलपाल ब्लॉक्सचा लिलाव फोमेंतो कंपनीने जिंकला होता. आता JSW ने इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) PRUDE च्या सरासरी विक्री किमतीच्या 109.80% लिलावाच्या प्रीमियमसह सुर्ला लोह खनिज खाण ब्लॉक मिळवला.

कुडणे, पिर्ण-थिवी, सुर्ल-सोनशी या तीन खनिज ब्लॉक्सचा 27 एप्रिलपर्यंत लिलाव होणार होता. त्यापैकी JSW कंपनीने सरासरी विक्री किमतीच्या 109.80% लिलावाच्या प्रीमियमसह सुर्ला लोह खनिज खाण ब्लॉक मिळवला.

राज्य सरकारने सुरवातीला सुमारे 40 खाण लिजांचा लिलाव करण्याची तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 88 खाण लीजचे दुसरे नूतनीकरण रद्द केल्याने सरकारकडून टप्प्याने याचा लिलाव करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

SCROLL FOR NEXT