मोरजी: फळाची अपेक्षा न ठेवता अनेक कलाकार आपली कला सदर करून रसिकांची मने जिंकत असतात, हे कलाकारा ईश्वराची सेवा करताना मनुष्यालाही समाधान देत असतात अश्या कलाकारांचा गौरव ज्यांच्या हाती होतो त्याहि व्यक्तीचा त्याचवेळी गौरव झालेला असतो. असे उद्गार मगोचे नेते जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या खास गौरव सोहळ्यात काढले.
मोरजी सार्वजनिक गणेशोत्सवात मागची 19 वर्षे सलगपणे कोणतेही मानधन न घेता सुरज गोवेकर हे स्वत: बरोबरच गोमंतकीय विविध प्रकारची वाद्ये वाजवणारे कलाकार, गायक कलाकार आणून ते या ठिकाणी आपली कला सादर करतात. या कार्यक्रमात त्यांनी कधीच मानधन घेतले नाही. त्यासाठी सुरज गोवेकर यांचा खास गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मोरजी सर्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नाना उर्फ चन्द्रो दाभोलकर, श्रीकृष्णा आस्कावकर,सल्लागार प्रसन्नकुमार शेटगावकर, खजिनदार सुर्यकांत पेडणेकर, दीपक शेटगावकर, घनश्याम शेटगावकर, दादी शेटगावकर आदी उपस्थित होते.
विकास आजगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजेंद्र बोरकर, समता सुरज गोवेकर अर्जुन सुरज गोवेकर अजिंकेश नाईक व मुख्य गायक सुदेश नाईक यांच्या गायनाची मैफल रंगात आली होती. यावेळी जीत आरोलकर यांच्याहस्ते सुरज गोवेकर याना स्मृती चिन्ह देवून गौरव केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.