सोपटेंना निवडून देऊन गोव्याच्या विकासाला साथ द्या: सदानंद तानावडे Dainik Gomantak
गोवा

सोपटेंना निवडून देऊन गोव्याच्या विकासाला साथ द्या: सदानंद तानावडे

देशात आणि राज्यालाही भाजपा शिवाय पर्याय नसल्याने अनेक नागरिक, अनेक पक्षाचे नेते कार्यकर्त्ये भाजपात प्रवेश करत आहेत; तानावडे

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघातील सुजाण जनतेला पुन्हा एकादा भाजपला साथ देताना तुम्हाला दयानंद सोपटे याना आमदार म्हणून निवडताना तुम्हाला मंत्री म्हणूनही निवडावे लागेल, असे आवाहन भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी वरचावाडा मोरजी येथील भाजपचे उमेदवार आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopate) यांच्या प्रचारा दरम्यान कोपरा सभा आयोजित केली होती, तेव्हा ते बोलत होते.

7 रोजी आयोजित केलेल्या सभेला आमदार दयानंद सोपटे, मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, महिला अध्यक्ष दीपा तळकर, भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर नयनी शेटगावकर, एकता चोडणकर, तारा हडफडकर पंच मुकेश गडेकरआदी उपस्थित होते. (Support the development of Goa by electing Dayanand Sopte Sadanand Tanawade)

'देशात आणि राज्यालाही भाजपा शिवाय पर्याय नसल्याने अनेक नागरिक, अनेक पक्षाचे नेते कार्यकर्त्ये भाजपात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांचे हात बळकट करण्यासाठी मांद्रेवासियांनी आपला उमेदवार आमदार दयानंद सोपटे याना विजयी करताना एक लक्षात ठेवा, तुम्ही आमदारच निवडून देणार नाही तर तुम्ही एका मंत्र्यालाही निवडून देणार आहात. जे कोणी विरोधीपक्षाचे नेते दिल्लीवरून स्थलांतरित पक्षासारखे येतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. निवडणुका (Elections) झाल्यावर ते आपली दुकाने आणि कार्यलये बंद करून जातील. त्यामुळे त्यांना जवळ न घेता केवळ भाजपला गोव्याच्या विकासाला साथ द्या', असे आवाहन तानवडे यांनी केले.

मुख्यमंत्री आठ हजार मतांनी कसे पडले?

सदानंद तानावडे यांनी बोलताना पार्सेकर हे भाजपामुळे आमदार मंत्री, मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री असतानाच सोपटे यांनी आठ हजार मतांच्या फरकाने पराभव केला त्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणे योग्य नसल्याचे सांगितले.

आमदार दयानंद सोपटे म्हणाले की, 'भाजपचे 27 आमदार निवडून येतील त्यामुळे कुणीही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. काही विरोधक आपण काहीच विकास केला नाही, असा दावा करतात. त्यांनी आपले तुणतुणे अगोदर बंद करावे, आणि जे लोकांकडे किंवा त्यांच्या घरीही आपल्या विकास कामाची पुस्तिका पोचलेली आहे, ती पडताळून पाहावे. आपल्यावर टीका करणाऱ्यांनी 15 वर्षात जर मतदारसंघाचा विकास केला असता, तर मुख्यमंत्री असतानाही मतदारांनी घरचा रस्ता का दाखवला? टीका करणाऱ्यांनी अगोदर आपल्या पायाखाली काय जळते ते पाहावे.'

अन्यथा पुराव्यासहित उघडे पाडू!

आमदार दयानंद सोपटे यांनी माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांना इशारा देताना जर निवडणूक होईपर्यंत आपल्यावर टीका थांबवली नाही, तर आपण पुराव्यासहित पालये पठारावरील इमारतीची प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT