मोरजी : एका बाजूने धो धो पाऊस आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना पिण्याच्या पाण्याचे नळ मात्र कोरडेच आहेत. ही स्थिती सध्या मोरजीत उद्भवली आहे. ज्या पद्धतीने विजेचा लपंडाव सुरू आहे, त्याचप्रमाणे पाण्याचाही लपंडाव सुरू आहे. नळ कोरडे असल्याने भर पावसात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यासंदर्भात पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता वारंवार वीज खंडित होत असल्याने आणि काही ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. (supplied water to morjim by tanker in rainy season )
चांदेल पाणी प्रकल्पातून येणारे पाणी पेडणे तालुक्याला अनियमित येण्याची अनेक कारणे समोर आलेली आहेत. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे ज्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यादिवशी पाणीपुरवठ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. ही समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत सरकारने कोणतीच पर्यायी योजना आखलेली नाही. जर अर्धा दिवस चांदेल प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला, तर किमान दोन ते तीन दिवस पाणी पेडणे तालुक्यासाठी मिळण्यास अडचण येते अशा तक्रारी आहेत.
पेडणे तालुक्यासाठी 22 एमएलडी पाण्याची दररोज गरज असते, परंतु चांदेल प्रकल्पातून दर दिवशी पंधरा एमएलडी पाणी सोडले जाते. त्यातील कितीतरी एमएलडी पाणी वाया जाते, शिवाय चोरीचाही प्रकार घडत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक किंवा हॉटेल व्यावसायिकांकडून थेट पंप बसवून पाणी ओढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.