Goa Police | North Goa SP  Dainik Gomantak
गोवा

Goa Police in Anjuna: उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर; हणजुणे परिसरात राबवली विशेष मोहिम

नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Goa Police in Anjuna: गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलील अधीक्षक निधीन वाल्सन यांनी आज, मंगळवारी हणजुणे (Anjuna) पोलिस स्टेशन परिसरात विशेष मोहिम राबवली. हणजुणे परिसरात पोलिस अधीक्षक वाल्सन यांनी इतर कर्मचाऱ्यांसह गस्त घातली. यावेळी नियमभंग करणाऱ्या अनेक वाहनचालकांसह इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी, अंजुना पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यावेळी वाल्सन यांच्यासोबत होते. सायंकाळच्या वेळी झालेल्या या विशेष मोहिमेत काही भागात नाकाबंदी करण्यात आली होती.

तसेच नियंभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रमान करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानेच होतात हे निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलीस विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारीच गोवा पोलिसांनी राज्यभरात सुमारे 2,000 वाहनधारकांवर कारवाई करत एकाच दिवसात 10 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT