Sunil Gudlar Dainik Gomantak
गोवा

Sunil Gudlar: दोनवेळा ACB च्या जाळ्यात फसलेला 'सुनील गुडलर'! बरबटलेली कारकीर्द; कसे पकडले रकमेसह? जाणून घ्या

Sunil Gudlar Arrest: २००६ साली उपनिरीक्षक म्‍हणून भरती झालेला गुडलर हा विद्यार्थीदशेत असताना चांगल्‍यापैकी बॉडीबिल्‍डर होता आणि याच माध्‍यमातून त्‍याने सर्वांचे वेधले होते.

Sameer Panditrao

मडगाव: २०१० साली एसीबीच्‍या जाळ्‍यात सापडणारा तत्‍कालीन पोलिस उपनिरीक्षक आणि २०२५ साली निरीक्षक झाल्‍यानंतर पुन्‍हा एकदा याच एसीबीच्‍या जाळ्‍यात दुसऱ्यांदा फसणारा सुनील गुडलर याची पार्श्वभूमी काय याबद्दल आता कित्‍येकांची उत्‍सुकता जागी झाली आहे.

२००६ साली उपनिरीक्षक म्‍हणून भरती झालेला गुडलर हा विद्यार्थीदशेत असताना चांगल्‍यापैकी बॉडीबिल्‍डर होता आणि याच माध्‍यमातून त्‍याने सर्वांचे वेधले होते. याच माध्‍यमातून तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आला. त्‍यानेच त्‍याला एका तारांकित हॉटेलमध्‍ये स्‍विमिंगपूलवर जीवरक्षक म्‍हणून कामाला लावले. या जीवरक्षकाच्‍या कामातही तो निष्‍णात होता. मात्र पोलिस अधिकारी झाल्‍यानंतर त्‍याची बहुतेक कारकीर्द कलंकितच राहिली.

नाव झाले आणि नंतर नामुष्‍की

आता तब्‍बल १५ वर्षांनी त्‍याला पुन्‍हा अटक झाल्‍याने १५ वर्षांपूर्वीची ही केस पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षभरापूर्वी सुनील गुडलर याची मडगाव कोकण रेल्‍वे पोलिस स्‍थानकात निरीक्षक म्‍हणून नियुक्‍ती झाली होती. त्‍याने आपल्‍या या एका वर्षाच्‍या कारकिर्दीत काही महत्त्वाची प्रकरणे धसासही लावली होती. ३० मार्च रोजी मडगाव रेल्‍वे स्थानकावर उतरविलेला बेकायदा बीफ प्रकरण त्‍याच्‍याचमुळे उघडकीस आले होते. त्‍यावेळी सगळीकडे त्‍याचे नावही झाले होते. पण शेवटी याच प्रकरणामुळे गुडलरवर दुसऱ्यांदा तुरुंगात जाण्‍याची नामुष्‍की आली.

कोण हा गुडलर ?

१.गुडलर हे कुटुंब मूळ कर्नाटकातील. सुनील गुडलर याचे वडील यलप्‍पा गुडलर नंतर गोव्‍यात स्‍थायिक झाले. गोव्‍यात येऊन ते सांताक्रूझ-पणजी या भागात राहत होते. त्‍यावेळी यलप्‍पा पणजी चर्च स्‍क्‍वेअरजवळ मोटरसायकल पायलट म्‍हणून भाडी मारायचे.

२.सुनीलची आई पुष्‍पा ही त्‍यावेळी पणजीतल्‍या बालभवनमध्‍ये कामाला होती. त्‍यावेळी बालभवनच्‍या अध्‍यक्षा विजयादेवी राणे या होत्‍या. त्‍यांच्‍याच ओळखीने सुनीलसाठी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्‍याकडे शब्द टाकला गेला आणि एक चांगला क्रीडापटू असलेल्‍या सुनीलला गोवा पोलिसात उपनिरीक्षक म्‍हणून नोकरी मिळाली.

३. तो २००६ बॅचचा तो उपनिरीक्षक होता. मात्र, चारच वर्षात अमलीपदार्थ विरोधी पथकात काम करताना ड्रग्‍ज पेडलर अटाला याचा पार्टनर असलेल्‍या डुडू या इस्रायली ड्रग पेडलरच्‍या तो संपर्कात आला आणि नंतर अशाच एका प्रकरणात त्‍याला अटकही झाली. मात्र, या प्रकरणातील तपासात नंतर त्रुटी सापडल्‍याने न्‍यायालयातून दोषमुक्‍तही झाला.

तब्‍बल बारा तासांचे ऑपरेशन

सुनील गुडलर आणि त्‍याच्‍या कार्यालयात हवालदार म्‍हणून करणारा महमद हुसेन या दोघांना पहाटे ४.३० वाजण्‍याच्‍या सुमारास अटक करण्‍यात आली असली तरी यासाठीचे ऑपरेशन सायंकाळी ४ च्‍या सुमारास सुरू झाले होते.

एसीबीने हुसेनचा फोन रेकॉर्ड केल्‍यानंतर दुपारी ४ च्‍या दरम्‍यान आपली माणसे मडगाव रेल्‍वे स्‍थानकाच्‍या परिसरात पेरून ठेवली होती. रात्री आठ वाजण्‍याच्‍या सुमारास हुसेनने त्‍या मटण विक्रेत्‍याला कोकण रेल्‍वे पोलिस स्‍थानकात बोलावून घेतले.

त्‍याच्‍याकडून २५ हजार रुपयांची रक्कम घेतली आणि ती रक्‍कम पोलिस निरीक्षक सुनील गुडलर याच्‍या ड्राव्‍हरमध्‍ये ठेऊन दिली. एसीबीच्‍या पोलिसांनी छापा टाकल्‍यावर गुडलरच्‍या ड्राव्‍हरमध्‍ये ही रक्‍कम सापडली. त्‍यामुळे पहाटे ४.३० वाजण्‍याच्‍या सुमारास एसीबीने गुडलर आणि हुसेन या दोघांनाही ‘उचलले’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT