Rohan Khaunte Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Sunburn Festival Moved to Mumbai: पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सनबर्न हा एक खासगी कार्यक्रम असल्याचे सांगितले असून, गोव्यात पर्यटनासाठी अनेक घटकांची आवश्यकता आहे

Akshata Chhatre

Goa Tourism Minister on Sunburn: आशियातील सर्वात मोठ्या डान्स म्युझिक फेस्टिव्हलपैकी एक म्हणून ओळखला जाणारा 'सनबर्न फेस्टिव्हल' (Sunburn Festival 2025) तब्बल १७ वर्षांची गोव्यातील आपली परंपरा मोडून आता पहिल्यांदाच मुंबईत आयोजित होणार आहे. आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, हा तीन दिवसांचा भव्य संगीत सोहळा १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत पार पडेल. या निर्णयामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तर दुसरं कोणीतरी येईल

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सनबर्न हा एक खासगी कार्यक्रम असल्याचे सांगितले असून, "गोव्यात पर्यटनासाठी अनेक घटकांची आवश्यकता आहे. जर सनबर्न झाला नाही तर दुसरं कोणीतरी येईल. हा कार्यक्रम कुठे घ्यायचा हे सनबर्न आयोजकांनी ठरवायचे आहे" असे पर्यटन मंत्री खवंटे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा मांडताना सांगितले की, सनबर्नसारखे कार्यक्रम उत्तर गोव्यासाठी योग्य आहेत, परंतु दक्षिण गोव्याने मात्र आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यावर भर द्यायला हवा.

सनबर्नच्या स्थलांतरणावर गोव्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सनबर्नसारख्या कार्यक्रमांना नेहमीच विरोध दर्शवला होता आणि हा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन गोमंतक पक्षाचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, या मुद्द्यावर आम्ही गोवेकरांसोबत आहोत आणि जर लोकांना हा कार्यक्रम हवा असेल तर आम्ही त्याचे समर्थन करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT