पणजी: आशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल २०२५’ आता गोव्यातील १७ वर्षांची परंपरा मोडून पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे. मात्र, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मुंबईतून हा महोत्सव पुन्हा गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे मत व्यक्त केले आहे.
गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे मत व्यक्त केले आहे. ‘सनबर्न’च्या आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, हा तीन दिवसांचा भव्य फेस्टिव्हल १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी, मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आयोजनामुळे देशभरातील संगीतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानेही या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. ‘सनबर्न’ गोव्यातून मुंबईत स्थलांतर करण्याचा निर्णय आयोजकांनी काही अचानक घेतलेला नाही.
गोव्याबाहेर आयोजन करा : अनेकांची इच्छा
आयोजकांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आम्ही देशभरात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी जवळपास ५० टक्के लोकांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल गोव्याबाहेर आयोजित केला जावा’, अशी इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, अशा आयोजनासाठी मुंबईला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यानंतर आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.
गोव्यात व्यवसाय वाढवणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असल्याने, सनबर्न महोत्सव मुंबईतून परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी सनबर्न आयोजकांशी बोलेन. शिवाय पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची विनंती करेन. - मायकल लोबो, आमदार, कळंगुट
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.