Sunburn Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2024: ‘सनबर्न’मुळे पुन्हा गालबोट; दिल्लीच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Delhi youth death at Sunburn: सनबर्न संगीत महोत्सवात हजेरी लाण्यासाठी गोव्यात आलेल्या दिल्लीच्या तरुणाचा म्हापसा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला

Akshata Chhatre

म्हापसा : सनबर्न संगीत महोत्सवात हजेरी लाण्यासाठी गोव्यात आलेल्या दिल्लीच्या तरुणाचा म्हापसा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविवारी रात्रीपर्यंत शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल येणार असून त्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल असे सूत्रांनी सांगितले.

धारगळ येथे सनबर्न हा संगीत महोत्सव सुरू आहे. दिल्लीत राहणारा २५ वर्षांचा तरुण शनिवारी या महोत्सवात उपस्थित होता. प्रकृती खालावल्याने मध्यरात्री त्याला म्हापसा येथील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिली. तरुणाच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

धारगळ येथे सुरू असलेला सनबर्न महोत्सव हा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असतो. 2007 पासून हा महोत्सव गोव्यात होत आहे.

जगातील ११ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा संगीत महोत्सव अशी त्याची ओळख आहे. या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) महोत्सवाचा संबंध अमली पदार्थांशीही जोडला जातो. यंदा देखील महोत्सव कुठे होणार यावरून वाद झाला होता.

2019 मध्ये सनबर्न महोत्सवाला गालबोट लागले होते. महोत्सवात तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात आंध्र प्रदेशमधून आलेल्या दोन जणांचा रांगेत थांबले असताना मृत्यू झाला होता. तर बेंगळुरूतील 26 वर्षांच्या तरुणाची महोत्सव सुरू असताना प्रकृती खालावली आणि तो कोसळला. त्याचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दिल्लीतील तो तरुण कोण?

करण कश्यप नावाचा हा तरुण दिल्लीतील रहिवासी होता आणि काही मित्रांसोबाबत तो सनबर्नसाठी गोव्यात आला होता. संगीत महोत्सवाच्यावेळी अचानक बेशुद्ध झाल्याने त्याला व्हिजन रुग्णालयात हलवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT