Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: थर्टी फस्टला सनबर्नचे आयोजन नकोच! आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांचा विरोध

यादिवशी होणार्‍या सनबर्नमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या भासेल

Kavya Powar

Sunburn Goa 2023: व्यवसाय, मनोरंजन यासारख्या गोष्टींवर मर्यादा हव्यात. सनबर्नच्या आयोजनातून हे प्रकार उघड होत असून तीन दिवसांसाठी सनबर्न पुरेशे आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला होणार्‍या सनबर्नच्या आयोजनावर बंदी असावी अशा शब्दांत हळदोणचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी थर्टी फस्टच्या संध्येला होणार्‍या सनबर्न कार्यक्रमास विरोध केला.

कारण, यादिवशी होणार्‍या सनबर्नमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या भासेल, यावर त्यांनी जोर दिला. सोमवारी ते माध्यमांसमोर बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

यापूर्वी सनबर्न ३० डिसेंबरपर्यंतच आयोजित केला जायचा. मात्र, यंदा आयोजकांनी आशा वाढल्याची दिसते. सध्या आयोजकांकडून ३१ रोजीच्या कार्यक्रमाचा जाहिरताबाजी व तिकिट विक्री सुरूच आहे.

हा त्यांचा प्रश्न असून सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुने गोवे फेस्ताच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यटन मंत्र्यांनी ३१ रोजी सनबर्न होणार नसल्याचा दिलेला शब्द पाळण्याची गरज फेरेरा यांनी व्यक्त केली.

यापूर्वी एकदा असाच प्रकार घडलेला. एका मंत्र्यांनी आयोजकांसोबत अखेरच्या क्षणी डिल करून सनबर्नला परवानगी दिली होती. याप्रकारची पुर्नरावृत्ती आता होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येस गोव्यात लोकांची मोठी वर्दळ असते, याशिवाय स्थानिक लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक असतात. त्यामुघे ३१ रोजी सनबर्नचे आयोजन केल्यास लोकांना त्याचा प्रचंड त्रास व गैरसोय होऊन मोठी वाहतूक कोंडी होईल. तसेच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. यापूर्वी केरळमधील एका धार्मिक स्थळावर हल्ले झाले आहेत. त्याची पुर्नरावृत्ती टाळण्याची गरज आहे. कारण, गोवा हे सॉफ्ट टार्गेट बनू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT