Goa Live Updates 11 December 2023 | Goa Breaking News
Goa Live Updates 11 December 2023 | Goa Breaking News Dainik Gomantak

Goa Updates 11 December: गोव्यातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सनबर्न 28, 29 आणि 30 डिसेंबरलाच
Published on
sunburn
sunburn Dainik Gomantak

सनबर्न 28, 29 आणि 30 डिसेंबरलाच

सनबर्न फेस्टिव्हल 28, 29 आणि 30 डिसेंबर रोजीच होईल. तसेच या काळात रात्री १० वाजेपर्यंत सनबर्न महोत्सव सुरू राहील. 31 डिसेंबरसाठी बुक केलेल्या तिकिटांचे पैसे परत केले जातील, अशी माहिती सनबर्नचे आयोजक हरिंदर सिंग यांनी दिली आहे.

दंडात्मक कार्यवाही झालेले मुंबईचे पर्यटक
दंडात्मक कार्यवाही झालेले मुंबईचे पर्यटक दैनिक गोमंतक

कळंगुटमध्ये गाडीच्या टपावर बसून वाहन चालवणाऱ्या पर्यटकांना दंड

कळंगुटात वाहतूक कायद्याचा भंग करीत गाडीच्या टपावर बसून जीपगाडी चालवल्याच्या आरोपावरून मुंबईच्या पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची गाडीही जप्त करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची सुटका केली आहे.

साक्षी काळे
साक्षी काळे दैनिक गोमंतक

गोव्याच्या साक्षीला ब्राँझपदक

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या साक्षी काळे हिने ब्राँझपदक जिंकले. टी ११-१२ प्रकारातील महिलांच्या १०० मीटर शर्यतीत तिला तिसरा क्रमांक मिळाला.

Godinho Meets Gadkari
Godinho Meets Gadkari Dainik Gomantak

माविन गुदिन्हो यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

गोव्याचे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ZEE Heroes 2023 सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी बस पोर्टबाबत चर्चा झाल्याचे गुदिन्हो यांनी म्हटले आहे. या भेटीचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

गोव्यातील मच्छीमारांसाठी असलेल्या योजनेतील निधीत केंद्राकडून पाचपटीने कपात

 मच्छीमारासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना' याखाली २०२०-२१ साली गोव्याला केंद्राकडून ४१.४६ कोटी रूपये मंजूर झाले होते मात्र त्यात या वर्षी पाच पट कपात करण्यात आली आहे. २०२३-२४ या सालासाठी गोव्यासाठी फक्त ८.९३ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गोविंद गावडे आणि इतरांसह वेर्णा येथील 5 व्या आदिवासी विद्यार्थी संमेलनाला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत, त्यांनी त्याचा वापर करावा.

तसेच विद्यार्थ्यांना सायबर क्राईमच्या सापळ्यात न पडण्याचा सल्ला दिला. गोविंद गावडे म्हणाले की, आदिवासींसाठी गोवा विधानसभेसाठी राजकीय आरक्षण आवश्यक होते आणि राजकीय आरक्षण लवकरात लवकर व्हावे यासाठी पावले उचलली जात आहेत. मंत्री अॅलेक्स सिक्वेरा यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

शिवोली-मार्ना रस्त्यावर ट्रक पलटी

ब्रेक निकामी झाल्याने मातीने भरलेला ट्रक शिवोली-मार्ना रस्त्यावर उलटला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज (९६ कुळी मराठा) च्या २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी रविवारी झालेल्या निवडणूकीत सुहाळ फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा एकतर्फी विजय झाला. समाज संघटनेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच विक्रमी १२१८ मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

आगाशीत हिट अँड रनमध्ये कार पलटी

आगाशी येथे हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या SUV ने दुसऱ्या चारचाकीला धडक दिली. यामध्ये चारचाकी पलटी झाली. सुदैवाने चालक सुखरूप. अपघातानंतर SUV चालक घटनास्थळावरून पसार. पोलीस तपास सुरू

गोव्याच्या विधानसभेला 60 वर्षे पूर्ण

गोवा मुक्तीसंग्रामानंतर स्थापन झालेल्या विधानसभेला  9 डिसेंबरला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत

न्यू ईअर सेलिब्रेशन महागणार? गोव्याच्या विमान तिकीट दरात वाढ...  

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. याच कालावधीमध्ये विमान प्रवास, बस प्रवास तसेच हॉटेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होते. गेल्या वर्षीदेखील विमान तिकिटांमध्ये वाढ झाली होती आणि उपलब्ध माहितीनुसार यंदाचा विमान प्रवास 17 टक्क्यांनी महागला आहे.

करमळीत दोन गटात हाणामारी

काल (रविवारी) सायंकाळी करमळी येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेत धुळापी-खोर्ली येथील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले की दुसऱ्या गटाने हाणामारी सुरू केली. यामध्ये खेळाडू तसेच प्रेक्षक जखमी झाल्याची माहिती आहे.

कुंकळ्ळीमधील बेकायदेशीर अतिक्रमणाला कॉंग्रेस जबाबदार

कुंकळ्ळीचे नगरसेवक उद्देश देसाई यांनी कुंकळ्ळीमधील बेकायदेशीर अतिक्रमण आणि प्रदूषणासाठी काँग्रेस कुंकळ्ळी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण नाईक आणि राजकीय समर्थकांना जबाबदार धरले.

मिस डेफ इंडिया 2023 विनिता सरकारी नोकरीच्या शोधात; आरोलकरांनी दिली हमी

मोरजी गावाचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचे काम विनिता शिरोडकर हिने केले आहे. तिला सरकारी नोकरीची आवश्यकता आहे. सरकार दरबारी प्रयत्न करून प्राधान्याने विनिताला नोकरी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com