Goa Sunburn Canva
गोवा

Sunburn Festival: संगीत, नृत्य ही गोव्याची संस्कृती! मग विरोध का? माजी मंत्री आजगावकर

Manohar Ajgaonkar: ड्रग्जचा वापर होत असेल सरकारने ड्रग्ज सेवनावर बंदी घालावी

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: लोकांना सनबर्न संगीत महोत्सव नको असेल तर तो आयोजित का करावा?, असा सवाल करून माजी उपमुख्यमंत्री तथा माजी पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी म्हटले की, सनबर्न मुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळते, उच्चभ्रू वा श्रीमंत पर्यटक येतात, हेही तेवढेच खरे. ड्रग्जचा वापर होत असेल सरकारने ड्रग्ज सेवनावर बंदी घालावी, असेही ते म्हणाले.

गेल्या कित्येक वर्षांपासून सनबर्नच्या आयोजनाने फायदाही झालेला आहे. संगीत, नृत्य ही गोव्याची संस्कृती. गोव्याची संस्कृती टिकवून अशा प्रकारचे संगीत महोत्सव होत असतात तर त्याला विरोध का? असा प्रश्र्न करून ते म्हणाले, की जर अशा महोत्सवामध्ये ड्रग्जचे अंश सापडले तर सरकारने आयोजकांवर कडक कारवाई करावी.

माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी इनडोअर स्टेडियम विवाह, प्रदर्शन सारख्या खासगी कार्यक्रमांना देण्यासही विरोध दर्शविला. हे स्टेडियम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. हे स्टेडियम केवळ गोमंतकीय खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात चांगले स्थान मिळावे, त्यांचा दर्जा वाढवावा या शुद्ध हेतूने बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांची निगा राखणे, देखरेख करणे व त्यांचा दर्जा कायम राखणे ही सरकारची जबाबदारी आहे.

क्रीडा संकुले खासगी सोहळ्यांना देऊ नका!

पूर्वी क्रीडा संकुले खाजगी कार्यक्रमांसाठी कधीच दिलेली नाहीत. हे आताच घडू लागले आहे. हे स्टेडियम गोदाम होऊ नये, अशी आपली इच्छा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालणे अंत्यंत आवश्यक असल्याचेही बाबू आजगावकर यांनी म्हटले आहे. पेडणे येथील इनडोअर स्टेडियमसाठी ३६ कोटी रुपयांचा खर्च झाला. आणि सरकार आता हा स्टेडियम जीएमआर, इस्पात सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देते? पेडणे सारख्या गावात कबड्डी, खो खो सारख्या खेळांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही बाबू आजगावकर यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT