Sunburn Festival in Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Sunburn Festival: सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात राज्यातील विरोधी पक्षातील नेते सातत्याने बोलत आहे. याचदरम्यान सनबर्नची बदनामी केली जातेय असे म्हणत आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Manish Jadhav

यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरवर्षी उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनाऱ्यावर सनबर्नचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी आयोजनाचे ठिकाण बदल्याने वाद सुरु झालाय. आयोजकांनी दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा करताच विरोधाची ठिणगी पडली.

विरोधकांनीही बाह्या सारुन आयोजकांसह सरकारवर हल्लाबोल केला. यातच आता, उत्तर गोव्यातूनही सनबर्नला विरोध सुरु झाला आहे. तर दुसरीकडे, सनबर्नच्या आयोजकांनी 18 जणांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात शंभर कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला.

सनबर्नच्या आयोजकांनी मानहानीचा खटला दाखल केला

सनबर्न फेस्टिव्हलच्या (Sunburn Festival) विरोधात राज्यातील विरोधी पक्षातील नेते सातत्याने बोलत आहे. याचदरम्यान सनबर्नची बदनामी केली जातेय असे म्हणत आयोजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आयोजकांनी 18 जणांविरोधात शंभर कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला.

यामध्ये राजकीय पुढाऱ्यांसह काही मीडिया संस्थांचाही समावेश आहे. राजकीय पुढाऱ्यांमध्ये- गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांचा समावेश आहे.

अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच!

दरम्यान, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सनबर्नच्या आयोजनास कडाडून विरोध केला. व्हिएगस म्हणाले की, ''सनबर्नसारखे फेस्टिव्हल अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देतात. ही गोव्याची संस्कृती नाहीये. असे फेव्हिवल गोव्यातील (Goa) तरुणांना बिघडवतात, त्यामुळे याविरोधात बोलणे थांबवणार नाही. राज्यात कदापि असे फेस्टिव्हल होऊ देणार नाही.'' तर सनबर्नच्या आयोजकांनी दाखल केलेल्या खटल्याविरोधात ॲड. अमित पालेकर उच्च न्यायालयात आमची बाजू मांडतील, असेही आमदार व्हिएगस पुढे म्हणाले.

आम्ही दक्षिणेत सनबर्नला परवानगी देणार नाही!

बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यानंतर आमदार क्रुझ सिल्वा यांनीही सनबर्नविरोधात मोर्चा खोलला. उत्तर गोव्यात सनबर्नमुळे काय झाले हे आम्ही पाहत आहोत, त्यामुळे दक्षिणेत आम्हाला हा फेस्टिव्हल नको आहे. दक्षिणेतील पंचायती आणि लोकांचाही याला विरोध आहे. आम्ही जनतेसोबत आहोत, असे म्हणत आमदार सिल्वांनी हल्लाबोल केला. एवढ्यावरच न थांबता सनबर्नच्या आयोजकांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावरही सिल्वा यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आम्ही या मानहानीच्या खटल्याविरोधात न्यायालयात उत्तर देऊ असे सिल्वा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT