Morjim News  Dainik Gomantak
गोवा

Morjim News: खाजगी जागा मालकांकडून मोरजी किनाऱ्यावर पावसाळ्‍यातही पलंग

Morjim News: रेस्टॉरंट्‌सवर कडक कारवाई करण्‍याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News: पर्यटन हंगाम संपुष्टात आला असला तरी पावसाळी पर्यटन हंगामात मोरजी समुद्रकिनारी भागात सध्या खासगी रेस्टॉरंट व्यवसाय सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला पार्किंग व्यवस्था नसल्याने दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. त्‍यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशा रेस्टॉरंट्‌सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत चालत असतो. एप्रिलनंतर किनारी भागातील शॅक व्यवसाय बंद असतो. परंतु खासगी जागेत जी रेस्टॉरंट्‌स, रिसॉर्ट आहेत, त्यांना वेगळे नियम लागू आहेत की काय? असा सवाल उपस्थित करण्‍यात येत आहे.

विठ्ठलदासवाडा-मोरजी किनारी भागात सध्या खासगी जागेतील रेस्टॉरंट्‌सचा व्‍यवसाय सुरू असून, किनाऱ्यावर लाकडी पलंगांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मोठी समस्‍या निर्माण झाली आहे.

राज्‍यात पावसाळ्‍यातही काही पर्यटक येतात. त्यांना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. शिवाय ज्या रेस्टॉरंट्‌सला पार्किंगची व्यवस्था नसते, त्यांचे ग्राहक थेट रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते.

एखाद्या वेळी आपत्‍कालीन प्रसंग घडला किंवा अग्निशामन दलाची गरज पडली तर त्यावेळी दलाची गाडी तेथे कशी पोहोचेल? असा प्रश्‍‍न निर्माण होतोय.

संजय कोले, मोरजी

पावसाळ्‍यातही जी रेस्टॉरंट्‌स आस्थापने किनारी भागात सुरू असतात, त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था आहे की नाही याची चौकशी सरकारने करणे गरजेचे आहे. जे पर्यटक रस्त्यावरच वाहने पार्क करतात त्‍यांच्‍यावर तसेच संबंधित रेस्‍टॉरंट्‌सवर कडक कारवाई करावी. स्‍थानिक पंचायत तसेच मांद्रे पोलिसांनी ही समस्या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT