गोवा

Goa: आल्तिनो, पणजी येथे "इन गोवा : अ टाईम दॅट वॉज" छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

Goa: गोव्याच्या भूतकालीन वैशिष्ट्यांना न्याहाळण्याची संधी कला रसिकांना मिळाली

दैनिक गोमन्तक

काळाच्या ओघात आठवणी धूसर होत जातात. तरी कवडसे बनून त्या मनात हो - ना करत लकाकत असतात आणि त्यांच्या त्या तशा लकाकण्यात एक तऱ्हेची मौज असते. त्या चिमटीत पकडून न्याहाळता आल्या असत्या तर... ‘सुनापरान्त गोवा सेंटर ऑफ आर्टस्’ (Sunaparanta Goa Centre for the Arts) या आल्तिनो, पणजी (Pnajim) येथील संस्थेने ‘इन गोवा : अ टाईम दॅट वॉज’ (In Goa : A Time That Was) हे छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करून गोव्याच्या (Goa) भूतकालीन वैशिष्ट्यांना न्याहाळण्याची संधी कला रसिकांना दिली आहे.

गोमंतकीय पार्श्वभूमी असलेली ही छायाचित्रे त्या त्या काळाचा महत्वाचा दस्तावेज तर आहेतच परंतू ती पाहता-पाहता त्यातून कहाण्या उलगडायला सुरुवात होते. नाट्य, प्रणय, वेदना, आनंद या सारख्या भावनांत वैयक्तिकरित्या आपण गुंतत जातो. “इन गोवा: अ टाईम दॅट वॉज” या छायाचित्र प्रदर्शनात उदयोन्मुख कलाकार आणि फिल्ममेकर इप्शीता मैत्रा, फोटोग्राफर आणि लेखक वास्वो वास्वो आणि इतिहास संशोधक आणि स्थापत्यकार विश्‍वेश काकोडकर हे गोमंतकीय जीवनातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षणांचे भूतकालीन अवशेष रसिकांसमोर सादर करणार आहेत. हे तिघेही त्यांच्या कहााण्यातून आपल्याला वर्तमानातून भूतकाळात नेत, काळ आणि वेळेच्या अनाकारात दर्शकांच्या बांधीलकीला, कल्पनाशक्तीला आणि रसास्वादांना आवाहन करतात.

In Goa : A Time That Was

आपल्या “लॉस्ट ॲड्रेसेस ॲन्ड वन्स वॉज होम” या दोन भागांच्या संग्रहातून इप्शीता मैत्रा आपल्या वांशिक, वडिलोपार्जित, भौगोलिक सभोवतालाचं दर्शन फोटोग्राफिक पध्दती वापरून घडवतात. ज्या आज आपल्याला फार अभावानेच दिसतात. आपल्या गोव्याच्या वास्तव्यात, या नंदनवनाच्या शोधात आपल्या आयुष्याची काही वर्षे घालवलेले वास्वो वास्वो जुन्या पध्दतीने प्रक्रिया केलेल्या फोटोग्राफ्स मधून ‘रेमेम्बरन्स’ आणि ‘लॉन्गटायमर्स’ या दोन भागात त्या काळच्या ‘हिप्पी’ आणि ‘स्थानिक’ या दोन भिन्न पण सुंदर तऱ्हेने एकमेकांशी जुळवून घेतलेल्या जगाचं दर्शन घडवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT