Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्यासह पालेकरांना समन्स

निवडणुकीवेळी मालमत्ता विद्रुपीकरण : दोघांनाही पोलिस स्थानकात हजर राहण्याचा आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात आम आदमी पक्षाच्या प्रचारावेळी स्टीकर्स लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीसंदर्भात चौकशीस उपस्थित राहण्यासाठी पेडणे पोलिसांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांना समन्स बजावले आहे.

अमित पालेकर यांना 14 एप्रिलला, तर केजरीवाल यांना 27 एप्रिलला पोलिस स्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ‘आप’ने सरकारी तसेच काही खासगी मालमत्तांवर पक्षाचा प्रचार करण्यासाठी काढता न येणारे स्टीकर्स लावले होते.

या मालमत्ता विद्रुपीकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली होती. या प्रकरणानंतर सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) एक पथक गोव्यात आले होते.

‘ईडी’च्या तक्रारीवरून कारवाई

‘ईडी’ने मालमत्ता विद्रुपीकरण झालेल्या जागांची माहिती पालिका व पंचायत संचालनालयाकडून घेतली होती. या दोन्ही खात्यांनी त्यांचा अहवाल सादर केला होता.

त्याच्या आधारे काही पोलिस स्थानकांत ‘ईडी’ने तक्रारी दाखल केल्या होत्या. पेडणे पोलिस स्थानकातही तक्रार दिल्याने त्याच्या चौकशीसाठी ॲड. पालेकर यांना समन्स बजावले आहे.

या समन्सबाबत मला काहीच माहीत नाही. मला ते आज दुपारपर्यंत मिळाले नव्हते. मी सध्या गोव्याबाहेर पाच दिवसांसाठी जात आहे. मला एक मोबाईल कॉल आला होता.

मात्र मी तो घेऊ शकलो नाही. जर समन्स पाठवायचे होते तर पोलिसांनी दोन दिवस अगोदर पाठवायला हवे होते. समन्स मिळाल्यावर मी पोलिसांत जाईन. मात्र, आज मी गोव्याबाहेर चाललो आहे.

- ॲड. अमित पालेकर, आप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT