Heat Wave Dainik Gomantak
गोवा

Summer Heat Wave : गोव्यात उकाड्याचा कहर; कोकणात उष्णतेची लाट

Summer Heat Wave : कोकण विभागात अनेक उपविभाग येतात त्यातील गोवा विभागात उष्णतेची लाट नसल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. गोवा तसेच सिंधुदुर्ग भागात उष्णतेची लाट नसली तरी देखील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना उकाडा असह्य ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Summer Heat Wave :

पणजी, हवामान खात्याद्वारे कोकणात उष्णतेची लाट असल्याचे म्हटले आहे. मुंबई, रायगड या भागात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे.

गोवा आणि सिंधुदुर्ग या भागात तापमानाचा पारा जरी कमी असला तरी देखील उष्म्याने लाही-लाही होत आहे. कोकण विभागात अनेक उपविभाग येतात त्यातील गोवा विभागात उष्णतेची लाट नसल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. गोवा तसेच सिंधुदुर्ग भागात उष्णतेची लाट नसली तरी देखील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना उकाडा असह्य ठरत आहे.

हवामान विभागाद्वारे उष्म्यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली जातात ती पाहणे गरेजेचे आहे. राज्यात येत्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३५ अंशांदरम्यान राहणार असून हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या विशेष पत्रकात म्हटले आहे.

आर्द्रतेत वाढ

गोव्यात सर्वसामान्य कमाल तापमानाची मर्यादा ३४ अंश आहे त्यावर जाणारे तापमान हे कमाल तापमानाची मर्यादा ओलांडलेले असते.

ज्यावेळी राज्यातील तापमान कमाल तापमानाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी वाढते म्हणजेच ३७ अंशांवर पोहोचते त्यावेळी गोव्यात उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते. राज्यात या आठवड्यात तापमान ३५ अंशांवर जाण्याची शक्यता नसली तरीदेखील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात उकाडा वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa State Film Festival: सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान! CM सावंतांचे प्रतिपादन; राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून आणले गोव्यात, विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; 18 वर्षाच्या तरुणाला अटक

Droupadi Murmu: 'ऑपरेशन सिंदूर इतिहासात नोंदवले जाईल'! राष्ट्रपती मुर्मूंचे गौरवोद्गार; अर्थव्यवस्थेची सक्षमता केली अधोरेखित

Horoscope: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! थोडी सावधगिरी बाळगा, जोखीम टाळा

Goa Coconut Price: नारळ महागले! सरकारचे मोठे पाऊल; मिळणार 'इतक्या' दराने, Watch Video

SCROLL FOR NEXT