Suleman Khan Viral Video, Amit Palekar Inquiry X
गोवा

Amit Palekar Inquiry: 'षडयंत्राचा पर्दाफाश केला म्हणून माझी सतावणूक'; पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा पालेकरांचा आरोप

Suleman Khan Viral Video Case: जमीन हडप प्रकरणातील चौकशीअंती काही जमिनी बेनामी आहेत तर पोलिस बेनामी कायद्याखाली आरोप का ठेवत नाहीत असा सवाल ॲड. पालेकर यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Palekar Inquiry At Old Goa Police Station

पणजी: सरकारचे विविध घोटाळे विरोधकांनी उघडकीस आणल्याने पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार व मंत्र्यांच्या घोटाळ्यांविरुद्ध विरोधक आरोप हे करत असतात त्यासाठी संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याची गरज नाही. ज्याने जमीन हडप प्रकरणात पापे केली आहेत हे सरकारला माहीत आहे.

पोलिसांकडून ही सतावणूक सुरूच राहिल्यास उच्च न्यायालयात याविरुद्ध जावे लागेल कारण न्यायसंस्थाच न्याय देऊ शकते अशी सडेतोड प्रतिक्रिया ॲड. अमित पालेकर यांनी जुने गोवे पोलिस स्थानकात चौकशीस उपस्थित असताना दिली होती. सुमारे ५ तासांच्या पोलिस चौकशीनंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले व त्याला संशयित सुलेमान याचा दुसरा व्हिडिओप्रकरणी उद्या २४ रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा चौकशीस उपस्थित राहण्याचे नव्याने समन्स जारी केले आहे.

संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्यानंतर सोमवारी त्याचा दुसरा व्हिडिओ आपल्याविरुद्ध समोर येतो हे पोलिसांचेच षडयंत्र आहे. मला चौकशीसाठी बोलावण्यात येते व त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होतो हे सरकारने विरोधकांना धमकावण्यासाठी केले कृत्य आहे. ज्याने संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला पलायनास मदत केली त्याच्याविरुद्ध जामीनपात्र कलमे लावून त्याची सुटका होण्यास पोलिसांनी मदत केली.

विरोधकांनी या षडयंत्राचा पर्दाफाश केला म्हणून चौकशीच्या नावाने ही सतावणूक सुरू आहे. राष्ट्रीय राजकीय पक्षाचा गोव्यातील मी अध्यक्ष तसेच वकील आहे. त्यामुळे अशा सरकारच्या कृत्यांना ठामपणे उत्तर देऊ शकतो. आज पोलिसांनी माझ्याबाबतीत ही कार्यपद्धत अवलंबिली आहे, उद्या ती इतर कोणत्याही नागरिकाबाबत अवलंबिली जाऊ शकते. त्यामुळे गोमंतकियांनी सरकारच्या या दबावतंत्राविरोधात उभे राहावण्याची गरज आहे, असे आवाहन ॲड. पालेकर यांनी केले.

संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याची जमीन हडप घोटाळ्यातील भूमिका तसेच कोणी कोणाच्या नावावर हडप केलेल्या जामिनी नोंद केल्या आहेत त्याचा दस्तावेज जमा कऱण्याचे काम सुरू आहे. जमीन हडप प्रकरणातील चौकशीअंती काही जमिनी बेनामी आहेत तर पोलिस बेनामी कायद्याखाली आरोप का ठेवत नाहीत असा सवाल ॲड. पालेकर यांनी केला. जर जुने गोवे पोलिसांनी संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने दुसरा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

त्यासंदर्भात त्याच्यासमोर माझी चौकशी करायची असल्याचे सांगण्यात येत आहे. जुने गोवे पोलिसांनी संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या उपस्थितीत क्राईम ब्रँच अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सूरज हळणकर व मी अशी एकत्रित समोरासमोर चौकशी करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

मी पोलिसांसमोर वाकणार नाही, जर त्यांना मला अटक करायची असल्यास त्यांनी ती करावी असे रोखठोक उत्तर दिले.

आमदारांची उपनिरीक्षकाशी हुज्जत

आपचे गोवा निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांना पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये चौकशीवेळी बसवण्यात आले होते. त्यावेळी आपचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता उपनिरीक्षक सुदीन रेडकर याने त्यांना अडविले. यावेळी आमदार व्हिएगश यांनी उपनिरीक्षकांशी हुज्जत घातली. पोलिस स्थानक हे कोणाची जहागिरदारी नाही, तर जनतेसाठी आहे. लोकप्रतिनिधी असल्याने आपल्याला निरीक्षकांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांच्यात हा वाद सुरू असतानाच पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी त्याना केबिनमध्ये घेतले. ॲड. पालेकर यांना पोलिस अटक करतील, यामुळे जुने गोवे पोलिस स्थानकाच्या बाहेर आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT