Accused Suleman Khan And Police Constable Amit Naik Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Escape: सात दिवसांनंतरही सुलेमानचा ठावठिकाणा सापडेना! अमित नाईकच्या सुनावणीवर सगळ्यांच्या नजरा

Amit Naik Court Hearing: पोलिस कोठडीतून कर्नाटकातील हुबळी परिसरात पसार झालेला सुलेमान महमद खान ऊर्फ सिद्दीकी सात दिवसानंतरही गोवा पोलिसांना सापडू शकलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Escape Case

पणजी: पोलिस कोठडीतून कर्नाटकातील हुबळी परिसरात पसार झालेला सुलेमान महमद खान ऊर्फ सिद्दीकी सात दिवसानंतरही गोवा पोलिसांना सापडू शकलेला नाही.

या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचा दावा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी केल्यासही तीन दिवस उलटले, तरी सिद्दीकीपर्यंत पोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सिद्दीकीला कर्नाटकात पोचवण्यास कारणीभूत ठरलेला शिपाई अमित नाईक हा दक्षिण हुबळी पोलिसांना शरण आल्याने पोलिसांच्या हाती लागला. त्याने दिलेल्या माहितीवरून सिद्दीकीला कारमधून पळण्यास मदत करणारा हजरतसाब बावन्नावर ऊर्फ हजरत अलीला पोलिसांना पकडले. असे असले तरी गोव्यापेक्षा तब्बल ५२ पट मोठ्या असलेल्या कर्नाटकातून सिद्दीकीला पकडणे तीन चार पोलिस पथकांना कितपत शक्य होईल, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

सुलेमान हुबळीतच; पाटकरांचा पत्राद्वारे दावा

गोवा गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून गेलेला वाँटेड गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान महमद खान याला तत्काळ अटक करण्याची मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडे केली आहे. पाटकर यांनी परमेश्वरा यांना पत्र लिहिले असून, त्यात सुलेमान हा हुबळीमध्ये लपून बसल्याची माहिती दिली आहे. या पत्रात पाटकर यांनी म्हटले आहे की, गुन्हे शाखेतील आरोपी पळून जाण्यासाठी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यापासून रोखण्यात गोवा गुन्हे शाखेला अपयश आल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

गोव्यातील जमीन बळकावणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांवर जरब निर्माण व्हावी, यासाठी सुलेमानची अटक महत्त्वाची आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील गोवा सरकार व येथील पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल पाटकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने फरार व्यक्तीच्या त्वरित अटकेसाठी कर्नाटक अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सुलेमानला अटक करावी, अशी विनंती गोवा प्रदेश काँग्रेस आपणास विनंती करीत असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

२३ रोजी घेणार पालेकरांची जबानी

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची जबानी नोंदवल्यानंतर ॲड. अमित पालेकर यांना साक्षीदार म्हणून पोलिसांनी समन्स बजावले आहे. आज त्यांना जबानीसाठी बोलावले होते. मात्र, ते गोव्याबाहेर असल्याचे पोलिसांना कळविले आहे. त्यामुळे ते गोव्यात आल्यानंतरच पोलिसांसमोर जबानी देण्यास जाणार आहेत. अाता २३ डिसेंबर रोजी पालेकर यांना जबानीसाठी बोलाविले आहे.

हजरतला आज कोर्टात हजर करणार

या प्रकरणातील दुसरा संशयित हजरतसाब बावन्नावर ऊर्फ हजरत अली याची पाच दिवसांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्याच्या कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, संशयित हजरत अली याच्या जबानीतूनही पोलिसांना सुलेमानचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष

याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला अमित नाईक याच्या जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी पणजीतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. अली याचा पोलिस कोठडीचा रिमांड संपल्याने त्यालाही उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT