Narendra Sawaikar Viral Post Dainik Gomantak
गोवा

Viral Post: सुलेमानसाठी अमितने सूर्याजी पिसाळ व्हावे यासारखे दुर्दैव ते कोणते? गोव्यातील भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

Suleman Khan Escape Goa Police Custody: कोठडीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमित नाईक खानला बाहेर काढून, सोबतीने तो देखील फरार झाला.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाला. धक्कादायक बाब म्हणजे एका आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईकने शेखला कोठडीतून बाहेर काढले आणि दोघेही दुचाकीवरुन पहाटे अडीच वाजता फरार झाले. यावरुन राज्यात राजकीय वादंग निर्माण झाला असताना भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सुलेमान खान याच्या फरार होण्यावरुन फेसबुकवर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आलीय.

'एका सुलेमानसाठी एका अमितने सूर्याजी पिसाळ व्हावे यासारखे दुर्दैव ते कोणते?'

अशी पोस्ट सावईकरांनी केली आहे. यावरुन सुलेमान खानच्या पलायनवादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुलेमान खान हा जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर इतर गुन्हे देखील नोंद आहेत. गेल्या साडेचार वर्षापासून तो फरार होता. काही दिवसांपूर्वी त्याला अटक करुन त्याला गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोठडीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमित नाईक खानला बाहेर काढून, त्यासोबतीने तो देखील फरार झाला.

पलायनवादावरुन राज्य सरकार आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवली जात आहे. काँग्रेसने राज्याचे मुख्यमंत्री तथा गुहमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह पोलिसांना दोषी धरले आहे. अमित पाटकर, गिरिश चोडणकर आणि अमरनाथ पणजीकरांनी पोलिस आणि सरकारवर टीका केली. तसेच, गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, आता माजी खासदार सावईकरांच्या पोस्टने आणखी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT