Goa Suicide Case: मळा - सांताक्रुझ येथील चार खांबाजवळील मानसच्या ठिकाणी एका विवाहित महिलेचा मृतदेह खाडीत तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो ‘गोमेकॉ’त शवचिकित्सकेसाठी पाठवला आहे.
हा मृतदेह बामणभाट - मेरशी येथील सपना मणेरकर (३७) हिचा असून तिने आज सकाळी 6.30 च्या सुमारास आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती,अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना मणेरकर ही कुटुंबीय उठण्यापूर्वीच सकाळी ६ वा.च्या सुमारास स्वतःची दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडली. कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा ती व तिची दुचाकीही नव्हती. त्यामुळे ती काही कामानिमित्त गेली असावी,असा समज कुटुंबियांचा झाला. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नव्हती. तिच्या बेपत्ताबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्या आली नव्हती.
दरम्यान, एका महिलेचा मृतदेह मळा मानस येथील खाडीत तरंगत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी 10 च्या सुमारास देण्यात आली. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यात असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.
या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्या कुटुंबियांना ओळखणाऱ्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला व मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. कुटुंबीयांनी तिची ओळख पटविली. त्यानंतर गोमेकॉत शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकी आढळली फुटबॉल मैदानाजवळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना मणेरकर ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिचे मानसिक संतुलन बिघडलेले होते, त्यामुळे बरीच तणावाखाली होती. ती आज सकाळी अचानक कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली. दुचाकी घेऊन ती निघाली, मात्र जिथे तिचा मृतदेह सापडला तिथे दुचाकी सापडली नाही.
दुचाकीचा शोध घेत असताना ती सांताक्रुझ येथील फुटबॉल मैदानाच्या कंपाऊंडबाहेर पार्क केली होती. त्यामुळे ती मळा - सांताक्रुझ येथील चार खांबापर्यंत चालत आली असावी व त्यानंतर तिने पाण्यात उतरून आत्महत्या केली असावी. आत्महत्येनंतर काही तासांतच तिचा मृतदेह पाण्यावर तंरगताना आढळून आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.