फातोर्डा : वासवडो-बाणावली येथे मेरिका रॉड्रिगीस (27) या युवकाने आपल्या घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची तक्रार कोलवा पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. एका अज्ञात इसमाने याबाबत माहिती दिल्यानंतर कोलवा (Colva) पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता टेरेसवर लोखंडी बारला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे निर्दशनास आले. पोलिसांनी (police) या प्रकरणी पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी पाठवून दिला. अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, आज गिरी येथील उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी रात्री उशिरा पावणेबाराच्या
सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रमेश मडगावकर (पालये-उसकई) या 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर, सिद्धेश कळंगुटकर (रा. कळंगुट) हा जखमी झाला आहे. सिद्धेश हा दुचाकी चालवत होता, तर मयत प्रमेश त्याच्या मागे बसला होता.
यासंदर्भात माहिती देताना म्हापसा (mapusa) पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वार पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने येत असताना उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीची धडक एका कारगाडीला बसली. त्यानंतर दुभाजकाला व दुसऱ्या एका जीपला त्या वाहनाने धडक दिली. या अपघातात प्रमेशचे डोके दुभाजकावर आदळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस (police) उपनिरीक्षक आशिष पोरोब व हवालदार तुळशीदास नारोजी यांनी अपघाताचा (Accident) पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.