Sanjivani sugar factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani sugar factory: संजीवनी साखर कारखान्यातील ऊस तोडणी यंत्र पुन्हा कार्यान्वित

संजीवनी साखर कारखान्याने हे यंत्र 2010 मध्ये विकत घेतले होते

गोमन्तक डिजिटल टीम

धारबांदोडा तालुक्यातील दयानंदनगर येथील संजीवनी साखर कारखान्यात काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले ऊस तोडणी यंत्र पुन्हा सुरु करण्यात आले असल्याचे माहिती कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांनी दिलीय. त्या मशीनची आवश्यक ती दुरुस्ती केली असून सर्व्हिसिंगमध्ये बॅटरी बदलण्यात आली असल्याची माहिती कामात यांनी दिलीय.

हा कारखाना काही वर्ष ऊस तोडणीसाठी शेजारील राज्यांतील मशीन वापरत होता. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी संजीवनी साखर कारखान्याने हे यंत्र 2010 मध्ये विकत घेतले होते. मात्र त्यानंतर कित्येक वर्ष बंद अवस्थेत असल्याने या मशीनचा लिलाव करण्याची प्रक्रिया मार्च 2014 मध्ये कारखान्याने सुरू केली.

त्यावेळी 89 लाख रुपयांच्या आधारभूत किमतीला कंपनीने हे मशीन लिलावात आणले असून ते कोणीही घेतले नव्हते. त्यानंतर आता ते कार्यान्वित झाल्यानंतर, मशीन सुरळीतपणे काम करत असून या मशीनद्वारा कारखान्याच्या शेतात लागवड केलेल्या सुमारे 300 मेट्रिक टन ऊसाची काढणी केली जात असल्याचे कामत यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT