सुदिन ढवळीकर Sandip Desai
गोवा

सुदिन ढवळीकरांनी ‘दरबार’मध्ये घेतली शपथ...

निर्मिती ते शपथविधी: ढवळीकर ठरले नव्या हॉलमध्ये शपथ घेणारे पहिले मंत्री

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

पणजी: मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या दृष्टीने आजचा शपथविधी सोहळा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. दुसऱ्या टप्प्यात का होईना, मंत्रिमंडळ विस्तारावेळी ज्येष्ठतेच्या आधारे त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे अनेक शक्यतांच्या कोलाहलातही नव्या दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरले आहेत. एका अर्थाने दरबार हॉलच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणारे ढवळीकर यांचा हा बहुमान आणि भाग्यच मानावे लागेल.

दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ढवळीकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना राजभवन परिसरातील या दरबार हॉलच्या निर्मितीचा प्रस्ताव आला होता. ढवळीकर यांनी तो मंजूर करून यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची विशेष तरतूदही केली. लगेच तत्कालीन राज्यपाल (स्व.) मृदुला सिन्हा यांच्या उपस्थितीत दरबार हॉलचा पायाभरणी समारंभ पार पडला. मात्र, त्यानंतर ढवळीकर यांचे मंत्रिपद गेले. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात ढवळीकर निवडून आले आणि आता मंत्रिपदाची शपथही घेतली.

शपथविधी सोहळ्यासाठी हॉलची निर्मिती

काबो राजभवन हे पोर्तुगीज काळात उभारले आहे. सध्या ते शपथविधी सोहळ्यासाठी कमी पडते आणि अडचणीचे ठरते म्हणून शपथविधी सोहळ्यासाठी या दरबार हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी सोहळा झाला. मात्र, आज दरबार हॉलमध्ये शपथ घेणारे ढवळीकर हे पहिले मंत्री ठरले. त्यानंतर नीळकंठ हळर्णकर आणि नंतर सुभाष फळदेसाई यांनी शपथ घेतली.

दरबार हॉलची निर्मिती माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झाली. इथेच मला उपराष्ट्रपतींनी सर्वांत प्रथम सन्मानित केले. त्याच दरबार हॉलमध्ये सर्वांत प्रथम शपथविधी घेण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य समजतो. हा माझ्या मतदारसंघातील लोक आणि राज्यातील हितचिंतकांचा आशीर्वाद आणि सन्मान समजतो.

- सुदिन ढवळीकर, मंत्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally: रामलीला मैदानावर 1977 नंतरचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन; पण 'पुढे काय?' हा कळीचा प्रश्न कायम!

Plane Crash Video: भररस्त्यात विमान कोसळलं अन् आगीचा भडका उडाला! भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Goa Tourism: गोव्यासाठी केंद्राची नवी पर्यटन योजना, जुने गोवेतील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणार; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची माहिती

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का! 2 स्टार खेळाडू अचानक बाहेर, आता संघासमोर नवं आव्हान

RGP Congress Alliance: ''12 जागा द्या, नाहीतर स्वतंत्र लढा", आरजीचा काँग्रेसला अल्टीमेटम; आघाडीचा तिढा कायम

SCROLL FOR NEXT