पणजी: स्मार्ट मीटर जोडणीला सद्यस्थितीत मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे; परंतु हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी कॉंग्रेस व इतर कोणी करत आहेत म्हणून तसे करता येणार नाही. यंदा निवडणूक वर्ष असल्याने मी याविषयावर काही भाष्य करणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ते मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते.
ढवळीकर म्हणाले, एखादा प्रकल्प ज्यावेळी रद्द करायचा असतो, त्यावेळी त्याला विशिष्ट प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतून, वेगवेगळ्या कायद्याच्या कलमांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. नागरिकांनी हे गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, भविष्याच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यायचे ते घेतलेच पाहिजेत. आता संगणक आणि ‘ए-आय’चा वापर वाढत आहे. येणाऱ्या काळात नवतंत्रज्ञान सर्व ठिकाणी येईल, त्यामुळे आम्हाला भविष्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे.
दरम्यान, आम्ही सध्या युतीत असल्याने प्रियोळ मतदारसंघात सुनील जल्मी यांना उमेदवारी द्यावी की नाही, हा प्रश्न नंतर येतो; कारण जल्मी हे जिल्हा पंचायत सदस्य आहेत आणि त्यांना जर ‘मगो’त प्रवेश द्यायचा असेल तर त्यांनी कायद्यानुसार जिल्हा पंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊन प्रवेश करणे गरजेचे असल्याचे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.
९० टक्के वीजबिलांमध्ये सुधारणा
खात्याकडून नागरिकांना जी वीजबिले देण्यात येत होती त्यातील ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे वीजबिलांमध्ये आता ९० टक्के सुधारणा झाली आहे. जर कुणाला अजूनही काही त्रुटी जाणवत असतील तर त्यांनी स्वतः माझ्याकडे या प्रश्नासंबंधी चर्चा करून मार्ग काढावा. मी सदोदित सेवेसाठी माझ्या घरी आणि कार्यालयात उपलब्ध असतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.