Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar : नाहक टीका करण्यापेक्षा सहकार्याचा हात पुढे करा

बांदोड्यात कलाकारांना मूर्तीचे साचे, आपद्‌ग्रस्तांना सहाय्य अन् रोपांचे वाटप

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : टीका करण्यापेक्षा सहकार्याचा हात पुढे करा, असे आवाहन करून कुणीतरी उठतो, सोशल मीडियावर ‘कमेंट'' करतो, त्यामुळे दिशाभूल होते, असे प्रकार आधी बंद करा आणि गरजवंतांना मदतीचा हात पुढे करा, असे आवाहन मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

बांदोडा पंचायतीत आज (गुरुवारी) खाऱ्या पाण्याचा प्रादूर्भाव झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात तसेच गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना मोफत साचे देणे आणि नागरिकांना रोपट्यांचे वाटप असे तीन कार्यक्रमांचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सुदिन ढवळीकर बोलत होते. हा कार्यक्रम माधवराव ढवळीकर ट्रस्ट तसेच कृषी खाते आणि बांदोडा पंचायतीतर्फे आयोजिण्यात आला होता.

या कार्यक्रमाला माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, इतर पंचसदस्य, कृषी खात्याचे अधिकारी संतोष गावकर, प्रणिता फळदेसाई आदींची उपस्थिती होती.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, खाऱ्या पाण्याच्या प्रादूर्भावामुळे अनेकांचे माड व इतर उत्पन्नाची नासाडी झाली, त्या लोकांना सलग तीन वर्षे अर्थसाह्य दिले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.

झाडांचे संगोपन करा!

आपल्या कुटुंबातील मुलांचे आपण संगोपन करतो, त्याचप्रमाणे झाडांचेही संगोपन करा. केवळ झाड लावले म्हणून चालणार नाही, तर झाडांची योग्य निगा राखताना त्यांची वाढ खुंटता कामा नये याकडेही कटाक्ष ठेवायला हवा. झाडांचे संगोपन म्हणजे आपल्यासह आपल्या पुढील पिढीच्या संवर्धनाची चांगली सोय असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

सहाही पंचायतींना लाभ

मडकई मतदारसंघात बांदोडा, कवळे, वाडी - तळावली, आडपई आगापूर दुर्भाट, मडकई तसेच कुंडई अशा सहाही पंचायतीत रोपट्यांचे वाटप करण्यात आले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या प्रयत्नांमुळे विविध रोपांचे वाटप झाले. कृषी खात्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात

SCROLL FOR NEXT