Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांना 'पॉवर'फुल खातं मिळणार?

महत्त्वाच्या खात्यांचं वाटप झाल्याने रेजिनाल्ड यांच्यासह ढवळीकरांच्या खात्याचीही चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आलं आहे. यावेळीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठवड्यात करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. महत्त्वाच्या सर्व खात्यांचं वाटप झाल्यामुळे मगोच्या सुदिन ढवळीकरांच्या पदरात कोणतं खातं पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ढवळीकर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी प्रयत्नशील होते अशीही चर्चा होती. मात्र आता त्यांच्याकडे 'पॉवरफुल' अशा वीज खात्याचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गृह, वित्त या महत्त्वाच्या खात्यांसह कार्मिक, दक्षता आणि राजभाषा खात्यांचा पदभार स्वत:कडेच ठेवला आहे, तर विश्वजीत राणेंकडे आरोग्य, नगरविकास, नगरनियोजन, महिला आणि बालकल्याण, वन खात्यांचा पदभार असेल. बहुतांश महत्त्वाच्या खात्यांचं वाटप आता पूर्ण झाल्याने आलेक्स रेजिनाल्ड आणि मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांना कोणतं खातं मिळेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यातच मगोपचे आमदार जीत आरोलकर यांनाही भाजपची ऑफर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. असं झाल्यास ढवळीकरांचा पत्ता कट करुन भाजपकडून (BJP) जीत आरोलकर यांना उरलेल्या खात्यांपैकी एखादं चांगलं खातं दिलं जाऊ शकतं.

रगोव्याच्या कॅबिनेट खातेवाटपानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान, कारखाने आणि बाष्पक, वीज, मत्स्योद्योग, बंदर कप्तान, पशूसंवर्धन, कौशल्य विकास, गृहनिर्माण, पुरातत्व पुराभिलेख, अनुसुचित जमाती, समाजकल्याण, वस्त्रोद्योग, अपारंपरिक उर्जास्त्रोत, सार्वजनिक गाऱ्हाणी या खात्यांचा पदभार अद्याप कुणालाही मिळालेला नसून सध्या ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच (CM) ठेवण्यात आली आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या खातेवाटपात मॉविन गुदिन्हो यांना वाहतूक, उद्योग, पंयाचत, तर रवी नाईक यांना कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा या मंत्रालयांचा पदभार देण्यात आला आहे. नीलेश काब्राल यांच्याकडे विधीमंडळ कामकाज, पर्यावरण, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक बांधकाम, तर सुभाष शिरोडकर यांच्याकडे सहकार, प्रोव्हेदोरिया, जलस्त्रोत खात्यांचा पदभार असेल. रोहन खंवटे यांच्याकडे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, छपाई आणि स्टेशनरी खाती असतील, तर गोविंद गावडे यांच्याकडे क्रीडा, कला आणि संस्कृती, ग्रामीण विकास खाती सोपवण्यात आली आहेत. बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांना महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT