Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असूनही सुदिन ढवळीकर शर्यतीत

मंत्रिमंडळाची उत्सुकता: आठ माजी मंत्र्यांची नावे निश्चित; फोंड्यात लॉटरी कोणाला?

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपच्या मंत्रिमंडळ स्थापनेबाबत उत्सुकता वाढली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ माजी मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. यात माविन गुदिन्हो, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, रमेश तवडकर, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश आहे. शिवाय अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्ते, आमदार आणि बहुजन महासंघाचा विरोध असूनही मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मात्र, भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांच्यापैकी एकालाच मंत्रिमंडळात स्थान द्यावे का, यावर अद्याप चर्चा सुरू आहे.

महिलांपैकी कोण?

मंत्रिमंडळात एक तरी महिला असावी, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, जेनिफर मोन्सेरात, की डॉ. दिव्या राणे यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. कारण विश्वजीत आणि बाबूश मोन्सेरात मंत्रिमंडळात असणार आहेत. या दोघींपैकी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे.

पंतप्रधानांसह दहा राज्यांचे मुख्यमंत्री येणार

सोमवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, हिमाचलचे जयराम ठाकूर, आसामचे हेमंत बिश्वा, कर्नाटकचे बसवराज बोम्मई, गुजरातचे भूपेंद्र पटेल, नागालँडचे नाइपू रिओ, उत्तराखंडचे पुष्करसिंग धामी, मणिपूरचे एन. बीरेन सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

SCROLL FOR NEXT