Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

पुलाच्या कामात नव्हे, डांबरीकरणात त्रुटी!

मंत्री सुदिन ढवळीकर : कामाशी बांधकाम खात्याचा संबंध नाही

दैनिक गोमन्तक

पणजी : ‘अटल सेतू’ पुलाची स्थिती वाईट नाही, तर त्यावरील रस्ता डांबरीकरणामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत. हा पूल एका नामांकित एल अँड टी कंपनीने बांधलेला आहे व त्यांचे जगात नाव आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने केले आहे व त्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याशी काहीच संबंध नाही, असे मत माजी बांधकाममंत्री व विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

‘अटल सेतू’वरील रस्त्यावर वारंवार खड्डे पडून अनेकदा त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे या पुलाच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे. या पुलाच्या रस्त्याची दुर्दशा इतक्या लवकर झाल्याने त्याला कोण जबाबदार यासंदर्भात प्रश्‍न केला असता मंत्री ढवळीकर म्हणाले की, या पुलाच्या कामाशी सार्वजनिक बांधकाम खात्याचा संबंध नव्हता. हा पूल एट अँड टी या कंपनीने बांधला असून रस्ता डांबरीकरणाचे काम जीएसआयडीसीने केले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतचा प्रश्‍न हा त्यांना विचारायला हवा. बांधकाममंत्री असताना या पुलाच्या प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधी आणण्याचे काम केले होते. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या वरील भागात काँक्रिट व बिटामिन याबाबत तांत्रिक त्रुटी राहिल्या आहेत. या पुलाच्या कामाची हमी तीन वर्षांची आहे तसेच कंपनीने त्याच्या दुरुस्तीचा पूर्ण खर्च करणे क्रमप्राप्त आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जीएसआयडीसीने करायला हवे. त्यामुळे या पुलावर पडलेल्या खड्ड्यांसाठी कंपनीला दोष देणे योग्य नाही. त्यांनी मोठमोठे प्रकल्प देशात तसेच परदेशात हाती घेऊन यशस्वीपणे काम पूर्ण केले आहे, असे ढवळीकर यांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, झुआरी पूल व बोरी पुलाचे पूर्वीचे काम हे जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आले होते व ते आता कालबाह्य झाले आहे. झुआरी पुलाच्या कठड्याला तडे व भेगा पडल्या असल्या तरी या पुलाची वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तपासणी करण्यात आली आहे व त्याची डागडुजी केली जात आहे. आयआयटीच्या एका पथकाने पुलाची तपासणी करून तो सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. नव्या झुआरी पुलाचा एक मार्ग येत्या डिसेंबर २०२२ पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT