Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar : राज्यातील निकृष्ट रस्त्यांसाठी माजी साबांखा मंत्री जबाबदार

आदित्य जोशी

Sudin Dhavalikar : राज्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. राजधानी पणजीतील हॉटमिक्स डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेले. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड असून, यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री, मुख्य सचिव, प्रधान मुख्य अभियंता, मुख्य अभियंता आणि सचिव जबाबदार आहेत. कारण त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांवरील नियंत्रण गेल्याने आज खात्याचे ‘खतखते’ झाले आहे, असे विधान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

काही महिन्यांपूर्वी हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांवर आज खड्डे पडलेत, ही गंभीर बाब आहे. कारण कनिष्ठ अभियंता कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ही योग्य वेळ आहे, अशी सूचनाही ढवळीकर यांनी केली. यावेळी सुदिन ढवळीकर म्हणाले की, माजी साबांखा मंत्र्यांच्या कार्यकाळात हा सगळा घोळ झाला आहे. त्यांच्या काळात या रस्त्यांचे काम मंजूर झाले होते.

शुद्ध पाण्याबाबत गोवा अव्वल

देशात घरोघरी नळाचे शुद्ध पाणी देणाऱ्या राज्यांमध्ये गोवा अव्वल स्थानावर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मी हे काम सुरू केले होते. त्यामुळे केवळ मंत्री योग्य असून चालत नाही. अधिकारी आणि संबंधित यंत्रणाही चोख असणे महत्त्वाचे आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

वेगावर नियंत्रण नसल्यानेच अपघात

राज्यातील बहुतांश अपघात हे अतिवेगाने वाहन चालवल्याने होतात. त्यासाठी वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितरित्या कारवाई केल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. झुआरी पुलावर झालेल्या अपघातावेळी त्या वाहनाचा वेग 100 किमी प्रतितासहून अधिक होता. त्यामुळे हा अपघात घडला, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live News Update: बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

SCROLL FOR NEXT