नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Burkina Faso Crisis: आफ्रिकन देशांमध्ये लष्करी संघर्ष आणि राजकीय अस्थिरता सामान्य आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमधून लष्करी संघर्षाच्या बातम्या रोज येतात.
Burkina Faso Crisis
Burkina Faso CrisisDainik Gomantak

Burkina Faso Crisis: आफ्रिकन देशांमध्ये लष्करी संघर्ष आणि राजकीय अस्थिरता सामान्य आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमधून लष्करी संघर्षाच्या बातम्या रोज येतात. पण आफ्रिकन देश बुर्किना फासोची (Burkina Faso) परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील 20 लाख लोक विस्थापित झाले आहेत. अलीकडेच, HRW च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, देशाच्या सैन्याने 223 नागरिकांना (Citizens) मारले असून ज्यात सुमारे 56 मुलांचा समावेश आहे. 2022 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे.

अल-कायदा (Al-Qaeda) आणि ISIS या दोन्ही दहशतवादी संघटना बुर्किना फासोमध्ये सक्रिय आहेत. लष्कर आणि या संघटनांमधील संघर्षात सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत. 2015 पासून या देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. 2022 मध्ये लष्करी नेते पॉल-हेन्री सँडाओगो दामिबा यांना देशाच्या काळजीवाहू राष्ट्रपती पदावरुन हटवल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

Burkina Faso Crisis
Burkina Faso: बुर्किना फासोमधील नागरिकांच्या हत्येवर UN ने व्यक्त केली चिंता, 'या प्रकरणाची...'

आफ्रिकेतील अनेक देश हवामान बदल (Climate Change) आणि राजकीय अस्थिरतेशी झुंजत आहेत, ज्यामुळे आधीच लोक सततच्या दुष्काळ आणि हिंसाचारामुळे गरिबीच्या गर्तेत अडकत आहेत. अलीकडच्या काळात पश्चिम आफ्रिकेतील अनेक देश हिंसाचारामुळे चर्चेत आहेत, ज्यामध्ये अनेक सशस्त्र बल, राष्ट्रीय सैन्य आणि आंतरराष्ट्रीय गट तसेच स्थानिक मिलिशिया यांच्यातील परस्पर लढाईचा समावेश आहे. बुर्किना फासोमध्ये, अल कायदा आणि ISIS च्या संघर्षामुळे सुमारे 2 दशलक्ष लोकांनी आपली घरे सोडली आहेत. इतकंच नाही तर बुर्किना फासोच्या लष्करावर आपल्याच नागरिकांची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Burkina Faso Crisis
Israel Hamas War: ''आम्ही युद्धविरामासाठी तयार आहोत, पण...''; हमासच्या लीडरने इस्त्रायलसमोर ठेवली ही अट

आरोप फेटाळून लावले

अलीकडेच, बुर्किना फासो सरकारने HRW ने केलेले नागरिकांच्या हत्येचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि देशातील अनेक परदेशी माध्यमांच्या कव्हरेजवर बंदी घातली आहे. बुर्किना सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, “नोडिन आणि सोरोमधील हत्येचे कारण शोधण्यासाठी कायदेशीर तपास सुरु झाला आहे.

परदेशी माध्यमांवर बंदी

बंडखोरांविरुद्धच्या लढाईत लष्कराने नागरिकांची हत्या केल्याचा आरोप करणारा रिपोर्ट प्रसारित केल्यानंतर बुर्किना फासोने बीबीसी (BBC) आणि व्हॉइस ऑफ अमेरिका रेडिओ नेटवर्कसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांवर बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com