Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

Gram Panchayat Karapur : कुळण येथे जागेचा शोध : कार्यालय स्थलांतर केलेली सध्याची जागा पडतेय अपुरी
Gram Panchayat Karapur
Gram Panchayat Karapur Dainik Gomantak

Gram Panchayat Karapur :

डिचोली तालुक्यातील कारापूर-सर्वण पंचायत स्‍वत:च्‍या कार्यालयासाठी आता नवीन पर्यायी जागेच्या शोधात आहे. पंचायतीचे कार्यालय स्थलांतरित केलेली सध्याची जागा अपुरी पडत असल्याने, सध्या अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पंचायतीचे कार्यालय सध्याच्या जागेतून नवीन जागेत हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कुळण येथील आधार हॉस्पिटल परिसरात जागा शोधण्यात आली आहे. लवकरच या जागेत पंचायत कार्यालय स्थलांतर करण्यात येणार आहे. सरपंच तन्वी सावंत यांनी तसे संकेत दिले आहेत.

कारापूर-सर्वण पंचायतीसाठी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. पंचायतीच्या पूर्वीच्या इमारतीच्या जागेतच ही नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महिन्यापूर्वी पूर्वीची इमारत मोडण्यात आली आहे. ती मोडण्यापूर्वी पंचायत कार्यालय कारापूर-तिस्क येथे एका लहान घरात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र ही जागा अपुरी आणि गैरसोयीची आहे. त्यामुळे लोकांची अडचण होत आहे.

Gram Panchayat Karapur
Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

तलाठ्यांचा कारभार चालतोय डिचोलीतून

पंचायत कार्यालय स्थलांतरित केलेली जागा अपुरी म्हणजेच एखाद्या कोंडवाड्याप्रमाणे आहे. या अपुऱ्या जागेत टेबल, खुर्च्या, कपाटे आदी साहित्याची गर्दी. त्‍यामुळे पंचायतीत येणाऱ्या लोकांना सोडाच पंचायत कर्मचाऱ्यांनाही मनमोकळेपणाने काम करता येत नाही.

मंडळाची बैठक घेणेही शक्य होत नाही. या इमारतीत तलाठी कार्यालयासाठी जागा नाही. परिणामी डिचोलीच्या मामलेदार कार्यालयात बसून तलाठ्यांना जनतेची कामे करावी लागत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com