Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

Goa News : राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

पर्वरी, गोव्याच्या सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक तथा पर्यावरणीय विकासासाठी मराठीला विना विलंब राजभाषेच्या दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव येथे झालेल्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात मंजूर करण्यात आला.

तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करणारा ठरावही या संमेलनात मंजूर करण्यात आला.

येथील आझाद भवनात या संमेलनाचे आयोजन मराठी असे आमुची मायबोली आणि गोमंतक मराठी अकादमीने केले होते. अध्यक्षस्थानी गो. रा. ढवळीकर होते. नागपूर येथील महाकवी सुधाकर गायधनी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. पाली, सत्तरी येथील श्री सातेरी महामया दिंडी पथकाने काढलेल्या दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली.

पहिल्या सत्रात मराठी राज्यभाषा व गोव्याचे भवितव्य या विषयावरील परिसंवादात प्रा विठोबा बगळी, शिवाजी देसाई आणि ॲड. वल्लभ देसाई यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. विठ्ठल ठाकूर होते. या परिसंवादात मराठीचे संस्कार नव्या पिढीवर करण्यावर एकमत झाले. अवित बगळे यांनी याचे सूत्रसंचालन केले.

Goa
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

अभिव्यक्तीचा आविष्कार आणि आम्ही युवक या विषयावरील परिसंवादात मच्छिंद्र चारी, गौरीश नाईक, कृष्णा पालयेकर, राधा गोपी गाड आणि प्रा. विनय बापट सहभागी झाले. युवापिढीही मराठीकडे कशी वळत आहे, या विषयीचे विवेचन या परिसंवादात केले. अध्यक्षस्थानी विजय नाईक होते. सोमनाथ पिळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

विविध ठराव ः

समारोप सत्रात गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी अमोलकर यांनी ठराव वाचन केले. यावेळी मंचावर उद्घाटक सुधाकर गायधनी, अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, स्वागताध्यक्ष प्रकाश भगत आणि कार्याध्यक्ष पौर्णिमा देसाई होत्या. जे विद्यार्थी चौथीपर्यंत मराठी शिकले आहेत त्यांना पाचवीपासून मराठी प्रथम भाषा म्हणून शिकवण्याची व्यवस्था सरकारने करावी असा ठराव या सत्रात मंजूर करण्यात आला.

सरकार कोकणीच्या संस्थांना जेवढे अनुदान देते तेवढेच अनुदान राज्यघटनेच्या १४व्या कलमानुसार मराठीसाठी कार्यरत संस्थांनाही द्यावे अशी मागणी करणारा ठराव तसेच गोमंतक मराठी अकादमीला पूर्ववत अनुदान सुरू करावे अशी मागणी करणारा ठराव या संमेलनाच्या समारोप सत्रात मंजूर करण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचालन शैलेश बोरकर यांनी केले. अशोक घाडी यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com