Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

मोठा खुलासा ! Sonali Phogat च्या फार्म हाऊसवर सुधीर सांगवानचा होता डोळा

Sonali Phogat Death: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या सोनाली फोगट यांच्या कथित हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

Sonali Phogat Death: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या सोनाली फोगट यांच्या कथित हत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. गोवा पोलिसांचे एक पथक बुधवारी हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात तपासासाठी पोहोचले. यावेळी पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले.

रिपोर्ट्सनुसार, सोनाली यांच्या कथित हत्येमागील एक हेतू त्यांच्या फार्म हाऊसचा देखील असू शकतो. सोनाली यांचे पीए सुधीर सांगवान याच्याकडे त्याच्या नावावर तयार केलेल्या फार्म हाऊसची कागदपत्रे आधीच मिळाल्याचे गोवा पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीरला सोनाली यांचा फार्म हाऊस 20 वर्षांसाठी लीजवर घ्यायचा होता. एवढेच नाही तर त्यासाठी 60 हजार रुपये वार्षिक भाडे देण्याचा करारही झाला होता. आता ही कागदपत्रे तयार करणाऱ्या वकिलाचीही गोवा पोलीस चौकशी करत आहेत. बातम्यांनुसार, फोगट यांच्या फार्म हाऊसच्या जागेचा दर एकरी 3 कोटी रुपये आहे. फार्म हाऊस साडेसहा एकरमध्ये पसरले आहे.

दुसरीकडे, या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ-गाझियाबादमधून शिवम नावाच्या व्यक्तीला बुधवारी, 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी हिसार येथील सोनाली यांच्या फार्महाऊसला भेट दिली. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी फार्म हाऊसमधून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सोनालीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर पीए सुधीर सांगवानचा सहकारी शिवम याच्या फार्महाऊसमधून लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर आणि काही कागदपत्रे चोरीला गेली होती. शिवम हा कम्प्यूटर ऑपरेटर असल्याचे सांगण्यात आले.

तसेच, हिस्सारचे पोलिस अधीक्षक लोकेंद्र सिंह यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, "कुटुंबींयाच्या तक्रारीवरुन काही दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल."

तत्पूर्वी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारने सोनाली यांच्या कथित हत्येच्या चौकशीशी संबंधित “गोपनीय अहवाल” हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना सुपुर्द केला आहे.' तपासाचा भाग म्हणून गोवा पोलिसांचे पथक हरियाणातील काही लोकांचे जबाब नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, टिकटॉक स्टार आणि रिअ‍ॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस' च्या स्पर्धक असलेल्या सोनाली फोगट (Sonali Phogat) (43) यांचा 22-23 ऑगस्ट दरम्यान गोव्यात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृत्यूच्या दोन दिवस आधी त्या दोन पुरुष साथीदारांसह गोव्यात पोहोचल्या होत्या. या प्रकरणी आतापर्यंत गोवा पोलिसांनी (Goa Police) सोनीली यांच्या दोन साथीदारांसह पाच जणांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT