Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: डोंगरभागात अचानक आग, झरीवाडा साखळीतील रहिवाशांमध्ये धास्ती

अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊनही आवश्यक ठिकाणी पोहोचू न शकल्याने स्थानिकांचीही तारांबळ उडाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa झरीवाडा पडोसे पर्ये या भागात गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे स्थानिक लोक बरेच धास्तावले. घरांपर्यंत पसरत येणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिकांना हातात बादल्या घेऊन धावपळ करावी लागली.

अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊनही आवश्यक ठिकाणी पोहोचू न शकल्याने स्थानिकांचीही तारांबळ उडाली. अग्निशामक दलाच्या जवानांनीही आग आटोक्यात आणण्यात योगदान दिले.

गुरूवारी सकाळी झरीवाडा येथील घरांच्या मागे असलेल्या डोंगर भागात आग लागली. सदर आग अचानक भडकल्याने स्थानिकांच्या मनात एकच धडकी भरली.

लागलीच स्थानिक पंचसदस्य लक्ष्मीकांत शिरोडकर यांनी डिचोली अग्निशामक दलाला संपर्क साधला. परंतु या भागात जाण्यासाठी योग्य वाट रस्ता नसल्याने दलाची गाडी पुढे जाऊ शकली नाही.

अखेर आग नियंत्रणात !

अग्निशामक दलाच्या जवानांनी शक्य होईपर्यंत पाण्याची फवारणी केली. आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

परंतु आग घरांच्या जवळ पोहोचू लागल्यानंतर स्थानिकांनी घरातील बादली, कळशी, तांब्या जे मिळेल ते भरून आणत आग घरांपर्यंत येण्यापासून रोखण्याची धडपड केली.

यात अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच पंचसदस्य लक्ष्मीकांत शिरोडकर यांनीही त्यांना मदत केली. अखेर सदर आग नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT