Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Suchana Seth: सूचना सेठच्या कौटुंबिक हिंसाचार खटल्याची सुनावणी; बेंगळुरूच्या कोर्टात काय घडलं?

सूचना सेठने 8 ऑगस्ट 2022 रोजी पती व्यंकटरामण याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता.

Pramod Yadav

Suchana Seth: आपल्याच चार वर्षीय मुलाच्या खूनाच्या आरोपात सीईओ सूचना सेठ अटकेत आहे. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन पलायन करत असताना सूचनाला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे 08 जानेवारी रोजी अटक करण्यात आली.

दरम्यान, सध्या सूचना न्यायालयीन कोठडीत असताना बेंगळुरू येथील स्थानिक न्यायालयात तिने दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची सुनावणी पार पडली.

सूचना सध्या कोठडीत असल्याने तिने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ती हजर न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याने पुरावे उपलब्ध करून देण्याच्या स्थितीत असलेल्या खटल्याची सुनावणी बेंगळुरू न्यायालयाने तहकूब केलीय. सुनावणीसाठी सेठ आणि त्यांचे वकील अनुपस्थित होते तर, पती पीआर व्यंकटरामण आणि त्यांचे वकील होते. यावर "याचिकाकर्त्याच्या बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, प्रतिवादीचे वकील उपस्थित आहेत," असे म्हणत सुनावणी पुढे ढकलली.

सूचना सेठने 8 ऑगस्ट 2022 रोजी पती व्यंकटरामण याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. पतीने तिचे आणि तिच्या मुलाचा शारीरिक शोषण केल्याचा आरोप याचिकेतून केला होता. पण, पती व्यंकटरामण याने कोर्टात सर्व आरोप फेटाळले आहेत.

दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया आणि मुलाच्या ताबा याच्या लढाई दरम्यान घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायालयाने सुरुवातीला व्यंकटरामण यांना सेठ यांच्या निवासस्थानी जाण्यास आणि त्यांच्या मुलाशी फोन किंवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधण्यास मनाई केली होती, परंतु नंतर घटस्फोटाची कार्यवाही सुरू असलेल्या कौटुंबिक न्यायालयाने या अटी शिथिल केल्या.

पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या याचिकेत सेठने दरमहा अडीच लाख रुपये खर्चाची मागणी केली होती.

घरातील हिंसाचाराच्या भीतीमुळे मार्च 2021 पासून ती वेगळी राहत होती, असा आरोप सेठने याचिकेत केला होता. बाळंतपणात आणि त्यानंतरही पतीने तिची काळजी घेतली नसल्याचा आरोप तिने केला. यासाठी तिने कोर्टासमोर व्हॉट्सॲप संदेश, फोटो आणि वैद्यकीय नोंदींच्या प्रती सादर केल्या होत्या.

आदेशाच्या तारखेपासून, याचिका निकाली काढेपर्यंत याचिकाकर्त्याला दरमहा 20,000 रुपये मासिक अंतरिम देखभाल खर्च देण्याचे आदेश 21 सप्टेंबर 2023 रोजी, न्यायालयाने पती व्यंकटरामणला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार विभक्त पत्नीला सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत 60,000 रुपये खर्च म्हणून दिल्याची माहिती व्यंकटरामण यांच्या वकिलांनी कोर्टाला दिली.

सूचना आणि व्यंकटरामण यांचे 18 नोव्हेंबर 2010 रोजी कोलकाता येथे लग्न झाले होते. 14 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

SCROLL FOR NEXT