Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: धार्मिक भावना दुखावल्या नसल्याच्या मतावर 'ते' ठाम! पोलिस स्थानकात 'एंट्री' मात्र पत्रकारांना चुकवत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर सुभाष वेलिंगकर यांनी गुरुवारी सायंकाळी शरणागती पत्‍करत डिचोली पोलिस स्थानकात हजेरी लावली. पोलिस त्‍यांचा सात दिवस शोध घेत होते. पत्रकारांचा ससेमिरा चुकवित ते मागील बाजूने पोलिस स्थानकात हजर झाले. बंद दरवाजाआड २० मिनिटे त्‍यांची जबानी घेण्‍यात आली. त्‍यांना पुन्‍हा , शुक्रवारी चौकशीसाठी पाचारण करण्‍यात आले आहे.

वेलिंगकर यांनी पोलिस चौकशीवेळी आपल्या मताशी ठाम राहताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. येत्या मंगळवारी (ता. १५) उच्च न्यायालयात वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी होणार आहे.

पत्रकारांना चुकवित ‘एन्ट्री’

वेलिंगकर आज सायंकाळी पोलिस स्थानकात उपस्थित राहणार, अशी माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी अाधीच डिचोली पोलिस स्थानकाबाहेर जमा झाले होते. मात्र, वेलिंगकर स्थानकात आले, तरी पत्रकारांना काहीच माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, वेलिंगकर यांनी पोलिस स्थानकाच्या मागील बाजूने प्रवेश केला. चौकशी आटोपून बाहेर येताना मात्र ते मुख्य दरवाजातून बाहेर आले.

जबानीची प्रक्रिया मार्गी

वेलिंगकर पोलिस स्थानकात येताच उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या उपस्थितीत वेलिंगकर यांची चौकशी सुरू केली. यावेळी डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर आणि तपास अधिकारी उपस्थित होते. बंद दरवाजाआड २० मिनिटे चाललेल्या चौकशीदरम्यान वेलिंगकर यांची जबानी नोंदविण्यात आली. जबानीवेळी वेलिंगकर यांनी नेमकी कोणती माहिती दिली, ते मात्र समजू शकले नाही.

कार्यकर्त्यांचा जमाव

सुभाष वेलिंगकर डिचोली पोलिस स्थानकात हजर राहणार असल्याचे समजल्यावर त्यांचे समर्थक तथा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्थानकाबाहेर जमले होते. दुपारी ३ वाजल्यापासूनच एक एक करीत कार्यकर्ते जमत होते. पोलिस स्थानकाचे प्रवेशद्वार बंद केल्याने कार्यकर्ते रस्त्यावरच थांबले होते. चौकशी आटोपून वेलिंगकर निघताच हे कार्यकर्तेही माघारी फिरले. यावेळी कार्यकर्ते शांत होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस स्थानक परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. वेलिंगकरांना खंडपीठाकडून

अटकेपासून संरक्षण

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने सुभाष वेलिंगकर यांनी चौकशीस सामोरे जावे तसेच पोलिस जेव्हा बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे, असे निर्देश देत त्यांना अटक न करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस वेलिंगकर यांना अटक होणार की नाही, यासंदर्भातील तर्क-वितर्कांना लगाम बसला आहे.

वेलिंगकरांना अटक का झाली नाही?

१. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५ खालील उपकलम ३ ते ६ नुसार संशयिताला चौकशीस उपस्थित राहण्याची नोटीस बजावल्यानंतर त्याला अटक करता येत नाही.

२. वेलिंगकर यांची जबानी नोंद केल्यानंतर जर पोलिसांना त्यांना अटक करायची असल्यास दिवाणी न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्‍यकता आहे, हे उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांच्या निदर्शनास आणून दिले.

३. त्यामुळे पोलिसांनी वेलिंगकर हे चौकशीसाठी ठाण्यात हजर झाल्यास त्यांना अटक करू नये, असे खंडपीठाने बजावले.

४. वेलिंगकर यांनी चौकशीवेळी सहकार्य केल्यास त्यांना अटक करणार नसल्याची भूमिका पोलिसांनी खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीवेळी स्पष्ट केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Secunderabad Vasco-Da-Gama Express: गोव्याला जाण्यासाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

SCROLL FOR NEXT