St. Xaviers Exposition Goa Dainik Gomantak
गोवा

St. Xavier DNA Controversy: चर्चने 'सामाजिक भान' राखले! आंदोलनातील संयमी भूमिकेची सर्व स्तरांतून प्रशंसा

गोमन्तक डिजिटल टीम

Subhas Velingkar Statement on SFX

मडगाव: सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबद्दल हिंदू रक्षा समितीचे अध्‍यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी जे वक्‍तव्‍य केले, त्‍यामुळे हजारो लोक रस्‍त्‍यावर उतरले व हे आंदोलन उग्र होऊन हाताबाहेर जाण्‍याची शक्‍यता होती. मात्र, वेळीच चर्चने लोकांना शांत राहण्‍याचे आवाहन करीत रस्त्यावर येणाऱ्या लोकांना रोखले. त्‍यामुळेच हे आंदोलन नियंत्रणात आले. चर्चने यासाठी जी भूमिका घेतली ती वाखाणण्‍याजोगी आणि प्रशंसनीय होती, अशी प्रतिक्रिया अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्‍या आंदोलकांनी व्यक्त केली.

फा. बॉलमेक्‍स पेरेरा यांची याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, वेलिंगकर जे बोलले तेच वक्‍तव्‍य अन्‍य कुठल्‍याही व्‍यक्‍तीने केले असते, तर एवढी तीव्र प्रतिक्रिया आली नसती. मात्र, वेलिंगकरांना मुद्दामहून अशी वक्‍तव्‍ये करून लोकांना भडकावायचे असते. हे यापूर्वीही दिसून आले आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा म्हणाले, चर्चने लोकांना निषेध करा असे सांगितले असते, तर हे आंदोलन चिघळले असते. हे सर्व पाहता चर्चने जी भूमिका घेतली ती एकदम योग्‍य होती.

ख्रिस्‍ती लोकांवर अजूनही चर्चचा पगडा कायम असून चर्चने केलेले आवाहन हे लोक अजूनही गांभीर्याने घेतात. यावेळीही चर्चने आम्‍हाला आदेश द्यावा असा आग्रह लोक करीत होते, पण चर्चने सामाजिक भान राखून अशी अतिरेकी भूमिका घेतली नाही, असे फा. व्‍हिक्‍टर फेर्रांव म्हणाले.

बिशपवरही होता दबाव

वेलिंगकर प्रकरणात चर्चने खंबीर भूमिका घ्‍यावी अशी आंदोलकांची मागणी होती. बिशप या प्रकरणी ठोस भूमिका घेऊ शकत नाहीत, तर त्‍यांनी गोवा सोडून जावे अशाप्रकारचे संदेशही ते समाज माध्‍यमांवर टाकत होते. असे असतानाही चर्च या दबावाला बळी पडले नाही. आंदोलकांनी रस्‍त्‍यावर येऊन सामान्‍य लोकांना त्रास देऊ नये असे आवाहन चर्चने केले. त्‍यामुळेच चर्चची भूमिका मला सर्वांत चांगली आणि खंबीर वाटली, असे मत दक्षिणायन अभियान संघटनेचे अध्‍यक्ष ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा यांनी ‘गोमन्‍तक’ टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Devgan - Kajol Goa Villa: अजय देवगन - काजोलच्या गोव्यातील अलिशान व्हिलात राहण्याची संधी; एका रात्रीसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

चीनचे धाबे दणाणले! नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

SCROLL FOR NEXT