Sanguem Constituency Dainik Gomantak
गोवा

सांगेत सातही पंचायतीवर सुभाषचा झेंडा

आमदार सुभाष फळदेसाई यांनी सर्वांचे मानले आभार

दैनिक गोमन्तक

केपे: सांगे मतदारसंघातील कावरे पिर्ला, रिवण, मळकर्णे, उगे, भाटी, वाडे कुर्डी व नेत्रावळी या सातही पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला असून, सर्व सरपंच व उप सरपंचांची बिनविरोध निवड झाली असल्याने सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आपल्या कार्यालयात सर्व पंचायतीच्या पंच सदस्यांचा त्यांनी आज गौरव केला.

(Subhash Phal Desai rule over seven Gram Panchayats in Sanguem Constituency)

राज्यात ज्या प्रमाणे पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. ते पाहता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार चांगले काम करीत असल्याची ही एक पावती असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. सांगे मतदारसंघाचा विकास करताना सर्व पंच सदस्यांबरोबर लोकांनाही विश्वासात घेऊन पुढील कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पंचायत, नगरपालिका, विधानसभा व आता पालिका निवडणुकीत सुद्धा सांगे मतदारसंघात भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांनी आमच्या सरकारवर व माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. सबका साथ सबका विकास हे आमचे ब्रीद वाक्य असून त्यादृष्टीने आम्ही काम करीत आहे. असे त्यांनी सांगितले. सांगे मतदारसंघातिल सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून तो लोकांना विश्वासात घेऊनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT