Quepem Bridge |Goa
Quepem Bridge |Goa  Dainik Gomantak
गोवा

Quepem Bridge: देवसा-केपे येथे नवीन पूल उभारणार

दैनिक गोमन्तक

Quepem Bridge: देवसा-केपे येथील पूल कमकुवत झाला असून तो कधीही कोसळून पडू शकतो. यासाठी लोकांच्या मागणीनुसार काल सांगेचे आमदार तथा पुराभिलेख आणि पुरातनमंत्री सुभाष फळदेसाई व कपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी सदर पुलाची पाहणी करून त्याजागी नवीन पूल बांधून देण्‍याचे आश्‍‍वासन ग्रामस्‍थांना दिले.

देवसा ते गावकरवाडापर्यंत सहा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ सुभाष फळदेसाई व एल्टन डिकॉस्‍टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, केपेच्या नगरसेविका आलिंदा लासेर्दा, लुर्ड्स फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

देवसा हा छोटासा गाव सांगे मतदारसंघात येतो. या गावातील रस्त्याच्‍या डांबरीकरण कामाचा प्रारंभ झाल्‍याने डिकॉस्‍टा यांचे फळदेसाई यांनी आभार मानले. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष आहे असेही ते म्‍हणाले.

लोकांच्या मागणीनुसार केपे मतदारसंघाचा विकास करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी सरकारची योग्य ती साथ लाभत असल्याचे डिकॉस्‍टा यांनी सांगितले.

आज जास्तीत जास्त रस्‍त डांबरीकरणाचे काम केपे मतदारसंघात होत असले तरी देवसा गाव सांगे मतदारसंघात येतो म्हणून आम्ही ते काम हाती घेतले असे नाही असे त्यांनी सांगितले. मंत्री फळदेसाई यांच्या सहकार्याने केपे मतदारसंघाचा विकास केला जाईल, असेही ते म्‍हणाले.

राज्यातील विकासकामे करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोणताही भेदभाव करीत नाहीत. जशी विकासकामे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांत होतात, तशीच ती विरोधी आमदारांच्या मतदारसंघातसुद्धा केली जातात. त्‍यात कोणताही भेदभाव केला जात नाही. - सुभाष फळदेसाई, पुराभिलेख आणि पुरातत्त्व मंत्री

पूलाचे काम मान्सून पूर्वी करा!

देवसा गावाला जोडणारा छोटासा पूल कमकुवत झाल्याचे ग्रामस्‍थांनी मंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिले असता त्या पुलाची पाहणी करून दोघांही आमदारांनी सदर पुलाला प्राथमिकता देऊन शक्यतो पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना दिले आहेत.

पुलाच्या खालच्या बाजूला लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्‍यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक झाल्यास पूल कोसळून जीवितहानी होण्‍याची भीती ग्रामस्‍थांनी व्‍यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Disqualification Petition: कामत - लोबोंना दिलासा, पाटकरांना दणका; सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळली

Panaji News : तब्बल तीन कोटींची रक्कम असूनही नसल्यासारखीच; म्हापशातील दाम्पत्याच्या मुलांची दुर्दैवी कहाणी

New Aerocity In Goa: दिल्ली धर्तीवर गोव्यात एरोसिटी; नव्या पर्यटन संधी निर्माण होणार- पर्यटन सचिव

Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

SCROLL FOR NEXT