sub inspector charged with assault in goa  Dainik Gomantak
गोवा

संशयितावर हल्ल्याप्रकरणी गोव्यातील उपनिरीक्षकावर नोंदवला गुन्हा

या हल्ल्यात कुएलो याच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याचेही तक्रारीत नमूद

दैनिक गोमन्तक

सासष्टी: नावेली येथील एडविन कुएलो (25) हा तरुण अटकेत असताना त्याच्यावर 23 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कुएलो याने पोलिस उपनिरीक्षक स्टेनली गोम्स यांच्याविरोधात मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंद न केल्याने नावेलीतील स्थानिकांनी गुरुवारी पोलीस स्थानकात येऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. या हल्ल्यात कुएलो याच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनीच हल्ला करणे योग्य नसून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असे ॲड. सियोला वाझ यांनी सांगितले. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. वैद्यकीय अहवालानुसार कुएलो याला गंभीर दुखापत झाली असून अशा गुन्ह्याखाली 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. पोलीस मनाला येईल तसे वागू शकत नाहीत. कायदा सर्वांसाठी समान आहे. पोलिस स्टेशन लोकांसाठी सुरक्षित आहेत, असा संदेश द्यायला हवा, असे ॲड. वाझ यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT