Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: म्हादई नदीचा अभ्यास गरजेचा

Mahadayi River: अॅड. देविदास पांगम: गोवा विद्यापीठात खास कार्यशाळा

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादई नदीसंदर्भात गोवा सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे अधिक अभ्यास करणे गरजेचे असून जेणेकरून धोरण तयार करण्यात सहकार्य होईल, असेल प्रतिपादन ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केले.

ते गोवा विद्यापीठाच्या ‘मल्टी डिसीप्लिनरी क्लस्टर’तर्फे ‘म्हादई-अमल्टी डिसीप्लिनरी एक्सप्लोरेशन’ (म्हादई बहुउद्देशीय अन्वेषण) या शीर्षकांतर्गत गोवा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या फॅकल्टी ब्लॉक ‘बी’ मधील सेमिनार हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेच्या उद्‍घाटनसमयी बोलत होते. जलसंपदा खात्याचे माजी मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी, प्रा. राहुल त्रिपाठी, प्रा. गणेश सोमयाजी, डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित होते.

ॲड. पांगम म्हणाले, शैक्षणिक समुदाय म्हादई नदीच्या जलविज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि जीवशास्त्रातील तज्ञांना आणून अभ्यासाच्या अनुषंगाने मदत करू शकतो. जलसंपदा खात्याचे माजी मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांनी म्हादई वादाचा उगम आणि 2018 पासूनच्या म्हादई लवादाचा आढावा घेतला. त्यांनी म्हादईवर एक विश्लेषण देखील सादर केले. गोव्याच्या दृष्टीकोनातून या समस्येवर प्रकाश टाकला.

त्यांनी संभाव्य प्रभाव पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक आधारावर सखोल अभ्यासाची गरज आहे, असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत 20 सादरीकरणे होतील. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आणि राजशास्त्र तसेच सांस्कृतिक अभ्यास अशा विविध अंगांनी प्रज्ञावंतांनी आपली मते मांडली. म्हादई नदीसाठी चाललेल्या लढ्यातील सक्रिय कार्यकर्त्यांनी देखील या कार्यशाळेत आपली मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT